Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan : सलमान खानशी मैत्री जीवाची भीती, कपिल शर्मा बिश्नोई गँगच्या निशाण्यावर?

Kapil Sharma : बॉलिवूडचा भाईजान आता पुन्हा चर्चेत आला आहे. कपिल शर्माच्या कॅफेवर झालेला गोळीबार हे त्याचे कारण ठरले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सलमानशी मैत्री, जीवाची भीती

बिश्नोईच्या निशाण्यावर भाईजानचे भाई

बाबा सिद्धिकीनंतर कपिल शर्माला धमकी?

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे (Salman Khan ) कोट्यावधी चाहते आहेत. त्याला भेटण्यासाठी चाहते जीवाचे रान करतात. पण सलमानचे जवळचे मित्र आता मात्र टेन्शन मध्ये आहेत. कारण सलमानशी मैत्री जीवघेणी ठरणार असल्याचे दिसत आहे.

सध्या बॉलिवूडच्या भाईजानची झोप उडाली आहे. सलमान सोबत फोटो काढण्यासाठी, मैत्री करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांना आता मात्र जीव वाचवण्याची वेळ आली आहे. कॅनडामध्ये झालेला गोळीबार हे याचे मुख्य कारण ठरले आहे.

कपिल शर्माचा (Kapil Sharma) कॅप्स कॅफे नावाचा कॅफे आहे. या ठिकाणी एकदा नव्हे तर दोनवेळा गोळीबार झाला आहे. जवळजवळ 25 राऊंड फायर करण्यात आले. सुदैव म्हणावं लागेल की, इथे झालेल्या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सलमान खान कॅनडात झालेल्या या गोळीबाराला कारण ठरला आहे.

कथित शुटर धमकी देतो की, जो सलमान खान सोबत काम करेल, तो प्रत्येक लहान मोठा माणूस आमच्या निशाण्यावर असेल. त्यामुळे कपिल शर्मासोबतच सगळ्यांचे टेन्शन वाढलंय. कारण महिन्याभरातच कपिल शर्माच्या कॅफेवर दोनदा गोळीबार झाला आहे.

  • 4 जुलै 2025 कॅप्स कॅफेचं उद्धाटन

  • 10 जुलै 2025 कॅफेवर पहिला गोळीबार

  • 7 ऑगस्ट 2025 कॅफेवर दुसरा गोळीबार

कपिल शर्माच्या शोमध्ये नुकताच सलमान खान येऊन गेला होता. ही धमकी त्यामुळे असावी असे म्हटले जात आहे. कॅफेचे उद्घाटन होऊन महिन्याभरात कॅफेवर झालेला गोळीबार आणि त्यानंतर आलेली ही धमकीची ऑडीओ क्लिप एकच सांगते की, बिश्नोई गँगचा ( Lawrence Bishnoi Gang) राग काही कमी झालेला नाही. त्यामुळे बॉ्लिवूडमध्ये सलमानसाठी बळी पडण्याच्या घटना वाढण्याचा धोकाही आहे. कारण बरोबर 10 महिन्यांआधी मुंबईत 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9.30 वाजता भररस्त्यात माजी मंत्री बाबा सिद्धीकींवर गोळ्या झाडून त्यांना जिवे मारण्यात आले. सलमान खान सोबतची मैत्री हे त्याचे मोठे कारण ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trishansh Yog 2025: 30 वर्षांनी कर्मदाता शनीने बनवला अद्भुत योग; 'या' राशींची होणार अचानक चांदीच चांदी

Thurday Horoscope : मोठं घबाड हाती लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार नवं वळण

OBC Reservation : लक्ष्मण हाकेंनी सरकारविरोधात दंड थोपटले; आंदोलनातून आंदोलनाला प्रत्युत्तर देणार, VIDEO

Shukra Gochar 2025: 27 महिन्यांनी शुक्र करणार बुधाच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना आहेत धनलाभाचे योग

Satara Gazetteer : सातारा गॅझेटियर नेमकं आहे तरी काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT