'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत तीन वर्षांची लीप दाखवली आहे.
'पिंगा गर्ल्स'च्या नात्यात दुरावा आला आहे.
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत वल्लरीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) ही मालिका मैत्री आणि स्त्रियांच्या भावनांवर आधारित आहे. नुकतेच मालिकेत वल्लरीच्या मैत्रिणीचे लग्न पार पडले आहे. आता मालिकेला नवीन वळण येणार आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. आता या मालिकेत एक मोठा टर्निंग पॉइंट आला असून मालिका तीन वर्षांचा लीप घेत आहे. कथानक एका नव्या वळणावर येऊन पोहचणार आहे.
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत आता वेळ, परिस्थिती, नाती आणि स्वप्नं या सगळ्यांमधून पात्रांच्या आयुष्यात मोठे बदल घडलेले दिसणार आहे. वल्लरीला घरात कोंडून परीक्षेपासून थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र पिंगा गर्ल्स त्यातूनही उपाय काढतात. तर दुसरीकडे घरच्या लोकांच्या विरोधात जाऊन प्रेरणा अखेर तिला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्नगाठ बांधते. श्वेता त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये व्यस्त आहेत.
तीन वर्षांनी वल्लरीचे स्वप्न पूर्ण होताना दिसणार आहे. ती वकील झाली आहे. तिने स्वतःचे हक्काचे घर खरेदी केले आहे. मात्र तिची काही आपली नाती तिच्यापासून दुरावली गेली आहेत. काळासोबत पिंगा गर्ल्समध्ये दुरावा आला आहे. नवीन प्रवासात वल्लरीपासून श्वेता आणि मिठु दुरावल्या आहेत. त्याच्या आयुष्यात कोणते बदल झाले? पिंगा गर्ल्स पुन्हा एकत्र येणार का? हे सर्व पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
वल्लरीच्या आयुष्यात नवे संघर्ष, नवी लढाई सुरुच आहे. मैत्रिणींच्या नात्यातल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर वल्लरी मात्र स्वतःच्या स्वप्नांसाठी लढत आहे. वल्लरी पुन्हा सगळ्या मैत्रिणींना एकत्र आणण्यात यशस्वी होणार का? पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका आता फक्त मैत्रीची गोष्ट नसून प्रत्येक मुलीच्या संघर्षाची आणि स्वप्नपूर्तीची कथा आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत 10 ऑगस्टपासून नवीन प्रवास पाहायला मिळणार आहे. मालिका तुम्हाला कलर्स मराठीवर संध्याकाळी 7 वाजता पाहता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.