Horoscope Today: मेहनतीचा पैसा वाया घालवू नका, नाती जपा वाचा आजचे राशीभविष्य

Saam Tv

मेष

आज गंगापूजनासारखा उत्तम दिवस आहे. अनेक लाभ होतील. सुन जावयांचा सहवासा दिवस जाईल.

Mesh | saam tv

वृषभ

पैसा खर्च होणार आहे. कलाकारांना अडचणी उभ्या राहतील. मात्र लांबच्या प्रवासाच्या नियोजनामध्ये असाल तर त्या गोष्टी यशस्वी होतील.

Vrushabh Rashi Bhavishya | SAAM TV

मिथुन

इतरांवर दबदबा चांगला राहील. दिवस आनंदी जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. ठरवल्याप्रमाणे सुनियोजित घटना घडतील.

Mithun | saam tv

कर्क

जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. धनाची आवक जावक राहील. कुटुंबीयांचा सहकार्यामुळे पुढे जाल.

kark | saam tv

सिंह

भावंडांमध्ये जबाबदारीचे कार्य पार पाडाल .स्वतःहून जबाबदाऱ्या स्वीकाराल तश्या त्या योग्य प्रमाणे पारही पाडाल. जवळच्या प्रवासातून फायदा होईल.

सिंह | Saam Tv

कन्या

घर खरेदीचे योग आज आपल्या नशिबामध्ये आहेत. अनेक वर्ष याची वाट पाहत होतात अशा गोष्टी आज आयुष्यात सहज घडतील. दिवस चांगला आहे.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

गंगापूजनाचा आज दिवस आहे. उदक, देवी यांची उपासना फायदेशीर ठरेल. शेअर्स आणि लॉटरी मध्ये विशेष फायदा होईल.

तुळ | saam tv

वृश्चिक

जुनी दुखणी डोके वर काढतील. शत्रूंचा त्रास वाढेल. आजोळी मात्र संबंध दृढ होतील. आव्हानांना सामोरे जावे लागेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. काही वेळेला स्वतःचा हट्ट सोडून जोडीदाराचा विचार करणे योग्य ठरते.

Dhanu Rashi | Yandex

मकर

कामाचा गाडा ओढावा लागेल. तशी ताकद आपल्या राशीमध्ये आहे. न बोलता कामे कराल. अचानक धनालाभाची सुद्धा शक्यता आहे.

मकर | Saam Tv

कुंभ

भाग्योदय होणार अशा घटना नक्कीच घडतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सुख प्राप्त होईल. सद्गुरु भेटतील. शिव उपासना विशेष फलदायी ठरेल.

कुंभ | Saam Tv

मीन

दानशूरता वाढेल. आपल्या कामांमध्ये योग्य नीटनेटके ध्येय ठेवून पुढे जाल समाजकारणामध्ये यश मिळेल. पैसा , पत , प्रतिष्ठा यांच्यामध्ये भर पडेल.

Meen | Saam Tv

NEXT: भारतात फिरण्यासाठी सगळ्यात सुंदर Top 5 हिल स्टेशन तुम्हाला माहितीयेत का?

top hill stations in India | ai
येथे क्लिक करा