Salman Khan : सलमान खान झाला मालामाल; विकलं मुंबईतील आलिशान अपार्टमेंट, किंमत वाचून बसेल धक्का

Salman Khan Sold His Apartment : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आपले मुंबईतील अपार्टमेंट विकले आहे. किती कोटींमध्ये डील झाले, जाणून घेऊयात.
Salman Khan Sold His Apartment
Salman KhanSAAM TV
Published On

बॉलिवूडचा भाईजान (Salman Khan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान'मुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने आपल्या हटके स्टाइलने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. सध्या सलमान खान एका वेगळा कारणामुळे चर्चेत आला आहे. सलमान खानने आपले मुंबईतील आलिशान अपार्टमेंट विकले आहे. त्याच्या या कृतीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यामागचे कारण आणि अपार्टमेंट कितीला विकले, जाणून घेऊयात.

कितीला विकले?

सलमान खानच्या लग्जरी अपार्टमेंटची डील कोट्यवधींमध्ये झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानने त्याचे वांद्रे पश्चिम येथील घर विकले आहे. हे अपार्टमेंट त्याने तब्बल 5.35 कोटी रुपयाला विकले आहे. सलमानचे हे आलिशान अपार्टमेंट वांद्रे येथील पाली हिल या भागात होते. अपार्टमेंटच्या विक्रीसाठी स्टॅम्प ड्युटी 32.01 लाख रुपये आणि नोंदणी शुल्क 30 हजार रुपये होते. हे अपार्टमेंट 1,318 चौरस फूट जागेचे आहे. तर याला तीन कार पार्किंग आहेत.

कारण काय?

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानने मुंबईतील वांद्रे येथील आलिशान अपार्टमेंट रिअल इस्टेट व्यवहारासाठी विकले आहे. असे बोले जात आहे. या डीलमध्ये सलमान खानला खूप फायदा झाला आहे.

वर्कफ्रंट

अलिकेडच सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकली होती. चित्रपटातील यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली. हा चित्रपट 28 मार्चला रिलीज झाला.

आगामी चित्रपट

आता सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात भारतातील एका युद्धाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. लडाखच्या गलवान व्हॅली घडलेला हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बॅटल ऑफ गलवान' ही कहाणी जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची आहे. हे युद्ध पारंपरिक शस्त्रांऐवजी दगड, लाकडी काठ्या यांनी लढले गेले. कारण त्या भागात बंदुका वापरण्यावर बंदी होती.

Salman Khan Sold His Apartment
Shilpa Shetty Video : तंबाखू खाणाऱ्या पापाराझीला शिल्पा शेट्टीनं फटकारले, म्हणाली...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com