Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : 'वीकेंड का वार'मध्ये भाईजानने सदस्यांना सुनावले खडेबोल; करणवीरने सलमान खानसोबत केलं गैरवर्तन, पाहा VIDEO

Salman Khan -karan veer Argument: 'वीकेंड का वार'मध्ये भाईजानने घरातील सदस्यांची शाळा घेतली. त्यात करणवीर मेहराने सलमान खानसोबत गैरवर्तन केले. नेमकं झाले काय, जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18 ) आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. बिग बॉसच्या फिनाले 19 जानेवारीला पार पडणार आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून श्रुतिका अर्जुनला घराचा निरोप घ्यावा लागला आहे. या आठवड्यात 'वीकेंड का वार' ला मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. सलमान खान घरातील सदस्यांची शाळा घेणार आहे.

'वीकेंड का वार'वार मध्ये सलमान खान घरातील सदस्यांना खडेबोल सुनावत असताना करणवीर मेहरा भाईजानसोबत गैरवर्तन करतो. 'बिग बॉस 18' च्या मंचावर 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान चाहतच्या बॉयफ्रेंडची सर्वांना ओळख करून देणार आहे. आता हे खरं आहे की सलमान खान चाहतसोबत प्रँक करत आहे, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

'वीकेंड का वार' मध्ये सलमान खान (Salman Khan) घरातील अनेक सदस्यांची शाळा घेतो. तो विवियनला त्याच्या वागणुकीबद्दल खूप बोलतो. विवियनच्या वाईट वर्तणुकीमुळे 'तिकीट टू फायनल' टास्क रद्द करण्यात आला होता. सलमान खानने करणवीरला सुनावताना म्हणाला की, 'तिकीट टू फिनाले' तू स्वतःसाठी खेळण्याऐवजी चुम दरांगसाठी खेळला. तू जर इतका महान आहेस तर तू शिल्पासाठी का खेळला नाहीस? यावर करणवीर उद्धटपणे सलमान खानला म्हणतो की, मी स्वतः ला आणि चुमला टॉप-5 मध्ये पाहतो. त्यावर सलमान बोलतो की, "तू जर इतका महान आहेस. तर हा खेळ तुझ्यासाठी नाही आहे. तू आताच घराबाहेर ये. "

बिग बॉसच्या घरात आता फक्त आठ सदस्य उरले आहेत. यांपैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी होणार आणि कोण घराला रामराम ठोकणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. प्रेक्षक आपली भरघोस मते देऊन आपला आवडत्या स्पर्धकाला सुरक्षित करत आहे. बिग बॉसच्या घरात शेवटच्या नऊ दिवसात काय राडा होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT