Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल'नं खरेदी केली आलिशान कार, पाहा पहिली झलक

Ankita Walawalkar New Car: 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने नवीन गाडी खरेदी केली आहे. नवीन गाडीसोबतचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Ankita Walawalkar New Car
Ankita Walawalkar SAAM TV
Published On

'बिग बॉस मराठी 5' फेम अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. तिला बिग बॉसमुळे खूप लोकप्रियता मिळाली. ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. ती एक सोशल मिडिया स्टार आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. चाहते तिच्या लग्नासाठी खूप आतुर आहे. आता मात्र अंकिता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Ankita walawalkar
Ankita walawalkarinstagram

अंकिता वालावलकरने नवीन गाडी खरेदी केली आहे. तिने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून चाहत्यांना दिली आहे. अंकिताने गाडी खरेदी करतानाचे होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव 'कुणाल भगत' आहे. तो एक संगीत दिग्दर्शक आहे. अंकिताने चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी सोशल मीडियावर "ती आलीये… वाट बघतेय" अशी एक स्टोरी टाकली होती. त्यानंतर काहीच वेळात अंकिताने ही गुडन्यूज दिली.

'कोकण हार्टेड गर्ल'नं आपल्या नवीन गाडीची पहिली झलक दाखवली आहे. अंकिताने आलिशान कार खरेदी केली आहे. तिने ऑडी खरेदी केली आहे. नवीन गाडी आणि नवऱ्यासोबत फोटो शेअर करून तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिलं आहे. अंकिताने लिहिलं की, "आवडी आली" नवीन गाडी खरेदी करायला अंकिता कुणालसोबत गेली होती.

Ankita walawalkar
Ankita walawalkarinstagram

अंकिता एक भन्नाट सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ती चाहत्यांना देते. तिच्या स्पष्ट वक्ता स्वभावाने तिने बिग बॉसच्या घरात असताना प्रेक्षकांची मने जिंकली. अंकिता वालावलकरचे इंस्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Ankita Walawalkar New Car
Amisha Patel : ती एक घटना अन् ४ तास बेशुद्ध पडली; अमिषाने 'गदर २' चित्रपटाची भयानक आठवण सांगितली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com