Ankita walawalkar : 'माझ्याकडे पैशांचं झाड नाही...' कोकण हार्टेड गर्लनं कुणाला सुनावले?

Ankita Prabhu Walawalkar Talk On Betting Apps :'बिग बॉस मराठी' फेम अंकिता प्रभू वालावलकरने बेटिंग ॲप्स आणि ऑनलाइन स्कॅम संबंधित आपले मत स्पष्टच मांडले आहे. ती नेमकं काय बोली, जाणून घ्या.
Ankita Prabhu Walawalkar Talk On Betting Apps
Ankita walawalkar SAAM TV
Published On

बिग बॉस फेम 'कोकण हार्टेड गर्ल' कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती एक व्यावसायिका देखील आहे. अंकिता प्रभू वालावलकरचा (Ankita Prabhu Walawalkar) सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच अंकिताचे एक युट्यूब चॅनल देखील आहे.

युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती चाहत्यांशी खूप कनेक्ट राहते. अनेक गोष्टींवर आपली मते मांडत असते. अलिकडेच तिने बेटिंग ॲप्स आणि ऑनलाइन स्कॅम संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, "मी बेटिंग ॲप्स प्रमोट करत नाही. मात्र अनेक लोक त्यात पैसे गुंतवतात आणि खूप वेळा फसतात आणि माझ्याकडे आर्थिक मदत मागतात. पण माझ्याकडे पैशांचे झाड नाही आहे."

पुढे अंकिता म्हणाली की, "आजकाल मोबाईलवरून होणाऱ्या फ्रॉडचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा पॉलिसी, बँकेच्या अकाउंटच्या नावाखाली फोन करून ओटीपी मागितला जातो. मला आर्थिक मदतीसाठी अनेक वेळा मेल्स, फोन येतात आणि माझ्या मॅनेजरला त्रास दिला जातो. फोनवर ८० हजार रुपयांची मदत मागितली जाते. कारण त्यांचे पैसे बेटिंग ॲपमध्य गेले."

शेवटी अंकिता बोलते की, "माझ्याकडे अशी पैशांची अपेक्षा करू नका आणि मॅनेजरलाही त्रास देऊ नका. मी कोणत्याही बेटिंग ॲपमध्ये पैसे हरल्यावर मदत करत नाही. असे रोखठोक उत्तर अंकिताने त्रास देणाऱ्यांना दिले. " अंकिता प्रभू वालावलकर कायमच परखडपणे मते मांडण्यासाठी ओळखली जाते. बिग बॉसमुळे अंकिताला खूप लोकप्रियता मिळाली.

Ankita Prabhu Walawalkar Talk On Betting Apps
Pushpa 2 Collection: 'झुकेगा नहीं साला...' बॉक्स ऑफिसवर फक्त पुष्पा भाऊचं राज्य, भल्याभल्या चित्रपटांना पछाडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com