Aishwarya Rai Bachchan canva
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्याचा 'तो' चित्रपट पाहून जय बच्चन प्रचंड संतापल्या होत्या; दिग्दर्शकाचा खळबळजनक खुलासा

Hum Dil De Chuke Sanam: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. जेव्हा जया बच्चन यांनी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पाहिला तेव्हा त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केला.

Saam Tv

बॉलिवूडचे दिग्दर्शक सजय लीला भन्साळी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यातलाच एक चित्रपटम्हणजे 'हम दिल दे चुके सनम'. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अजय देवगण या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल २५ वर्ष झाली आहेत. या चित्रपटानी बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता. इतकंच नाही तर हा चित्रपट "बर्लिन्स फिल्म फेस्टीव्हल"मध्ये देखील दाखवण्यात आला होता.

आज २५ वर्षांनंतरही चाहते या चित्रपटाचे कौतुक करतात. परंतु, ऐश्वर्या राय यांच्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री जया बच्चन हा चित्रपट पाहुन नाराज झाल्या होत्या असं म्हटलं जातं. 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट "बर्लिन्स फिल्म फेस्टीव्हल"मध्ये प्रदर्शित व्हावा म्हणून जया यांनी स्वता: पुढाकार घेतला होता.

परंतु, हा चित्रपट बर्लिन्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखवण्यात आल्यावर जया बच्चन यांची रिअॅक्शन पाहून त्यांना हा चित्रपट खास आवडला नाही असं दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना वाटले. 'स्टार प्लस'वरील 'स्टार टॉक' या शोमध्ये त्यांना झालेल्या गैरसमजाविषयी व्यक्त झाल्या होत्या. 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट बर्लिन्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रदर्शित झाला ही खुप मोठी गोष्ट आहे. हा चित्रपट आता जवळपास सर्व फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट "बर्लिन्स फिल्म फेस्टीव्हल"मध्ये दाखवण्यात यावा यासाठी डोरोथी आणि जया बच्चन यांनी खुप प्रयत्न केले होते. डोरोथी जेव्हा "बर्लिन वरुण हिते येत होते त्यावेळी एका टॅक्सी ड्रायव्हरनी त्यांना हा चित्रपटा पाहाण्यास सांगितले. त्या दोघांनी एकत्र हा चित्रपट पाहिला आणि त्याना हा चित्रपट खुप आवडला. ज्या दिवशी हा चित्रपट दाखवण्यात आला त्यावेळी जया बच्चन यांनी हा चित्रपट पाहिला आणि बाहेर येऊन फक्त हासल्या. यामुळे मला वाटलं त्यांना हा चित्रपट आवडला नाही. परंतु हे सर्व चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी झालं होतं.

जया बच्चन यांचा मला एकदा फोन आला होता. त्यावेळ त्यांनी मला विचारले, "तुम्हाला काय वाटलं मला हा चित्रपट आवडला नाही?" मला तो चित्रपट खुप आवडला होता ही सांगण्याची माझी ती पद्धत होती. मला त्यावेळी इतकच सांगायचं होतं की, बर्लिनला या चित्रपटासाठी शिफारस करावी आणि तो तिथपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करवा. त्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्या सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा नुक्ताच ओटीटीवर प्रदर्शित झालेला 'हिरामंडी' तूफान गाजला होता. त्यांनी या सिरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पन केले होते.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT