Saleel Kulkarni Praised Naach Ga Ghuma Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saleel Kulkarni : "एकच चष्मा लावून सगळे चित्रपट किंवा माणसं बघता येत नाही"; सलील कुलकर्णीची ‘नाच गं घुमा’बद्दलची पोस्ट चर्चेत

Saleel Kulkarni On Naach Ga Ghuma Film : परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांसह सेलिब्रिटीही चित्रपटाचे कौतुक करीत आहे.

Chetan Bodke

Saleel Kulkarni On Naach Ga Ghuma Film

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे कौतुक फक्त प्रेक्षकच करत नसून सेलिब्रिटीही करीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेहा चित्रपट पाहिला. या चित्रपटाचे तिने जोरदार कौतुक केले. अशातच गायक सलील कुलकर्णींनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले.

गायक सलील कुलकर्णीने पोस्टमध्ये लिहिलंय की, " "नाच गं घुमा..." मस्त आहे. आवडला... परेश मोकाशी या माझ्या मित्राचा विनोदाचा हा पोत खास आहे... विरळा आहे..!! जसं शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुफी संगीत, गझल, रॉक, Jazz... या प्रकारांना दाद द्यायला तो प्रकार समजून दाद देतात... तशी सरसकट एकच चष्मा लावून सगळे चित्रपट, नाटकं किंवा माणसं पण बघता येत नाही... हा चित्रपट पाहताना वृत्ती, प्रवृत्ती आणि सभोवताल ह्याचे खूप सूक्ष्म संदर्भ येतात... त्यातून विनोद निर्माण होतो... त्यासाठी ब्लॅक कॉमेडी, caricature, उपहास, अतिशयोक्ती हे सगळं समजूनच त्याकडे बघता आलं तर मजा येते..."

चित्रपटाचं कौतुक करताना सलीलने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मुक्ता बर्वेही आमची मैत्रीण सातत्याने स्वतःला नवे नवे चॅलेंज देते आणि लीलया ते पारही करते. नम्रता संभेरावने तिच्या पहिल्याच मोठ्या भूमिकेत षटकार मारला आहे. या चित्रपटानंतर नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील आणि ज्याला त्याच्या कॉलेज वयापासून रंगमंचावर पाहिलं आहे त्या सारंग साठ्येने संपूर्ण स्त्री प्रधान चित्रपटात सुद्धा त्याच्या अभिनयाने कमाल केली आहे. त्याच्याही तारखा मिळणं दिग्दर्शकांना नजीकच्या भविष्यकाळात अवघड होईल हे नक्की..." (Social Media)

पोस्टच्या शेवटी सलीलने लिहिले की, "आमचा मित्र सुनील अभ्यंकरने धमाल केली आहे आणि छोट्या मायराने लक्ष वेधून घेतलं.. तन्मय नरेंद्र भिडेने या लहान वयात एका चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी पेलली, यासाठी त्याच्या बाबाचा मित्र म्हणून मला खूप खूप कौतुक वाटलं... निर्माता स्वप्नील जोशी आणि या माझ्या सर्व मित्राचं मनःपूर्वक अभिनंदन !!" (Marathi Film)

सध्या बॉक्स ऑफिसवर स्त्रीप्रधान चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेली आहे. हा चित्रपट बुधवारी १ मे रोजी अर्थात ‘महाराष्ट्र दिनी’ प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि स्वप्नील जोशी यांनी केली आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशीने चित्रपटाच्या कथानकाचं लेखन केलं आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT