

kalyan CSMT AC Local rada Latest News : मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील गर्दी आणि त्यातून होणारे वाद मुंबईकरांसाठी आता नवे नाहीत. मात्र, कल्याण रेल्वे स्थानकावर दोन महिलांमध्ये झालेला वाद सर्व मर्यादा ओलांडणारा ठरला आहे. फर्स्ट क्लासच्या डब्यात चढण्याच्या (Kalyan railway station rush hour incident) कारणावरून दोन महिलांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये एका महिलेने दुसऱ्या महिलेचा चावा घेतल्याचा प्रकार घडलाय. कल्याण रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये चढण्यावरून दोन महिला प्रवाशांमध्ये झालेला वाद आता चर्चेचा विषय ठरला आहे. (women fight in Mumbai local train ladies compartment)
कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर गाडी आली होती. पण गर्दीची वेळ असल्याने डब्ब्यात चढायला अडचण येत होती. फर्स्ट क्लास डब्यात आधी कोणी चढायचे यावरून दोन महिलांमध्ये वादाची ठिणगी पडली. सुरुवातीला शाब्दिक चकमक सुरू झाली. पण पाहता पाहता वाद इतका विकोपाला गेला की, त्यातील एका महिलेने रागाच्या भरात दुसऱ्या महिलेच्या दंडाचा जोरात चावा घेतला. हे भांडण इतक्यावरच न थांबता, त्या महिलेने दुसऱ्या महिलेची बोटे पिरगळून तिला जखमी केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पीडित महिला वेदनेने विव्हळू लागली. डब्यातील इतर महिला प्रवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती.
रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी आणि त्यातही महिलांच्या डब्यात अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने उपचार देण्यात आले. कल्याण रेल्वे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. डब्यातील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांनी अधिक कडक पावले उचलण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
नेमकं काय झालं?
तक्रारदार प्रियंका थोरात या कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील गृहसंकुलात राहतात आणि अंधेरी येथे नोकरी करतात. दररोजप्रमाणे त्या सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक सहावरून प्रथम श्रेणी डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होत्या.त्यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. काही महिला उतरत होत्या, तर काहीजणी चढण्याचा प्रयत्न करत होत्या. या गोंधळात डब्यातून उतरणाऱ्या एका अनोळखी महिलेने प्रियंका यांना चढण्यास मज्जाव केला. स्वतःही नीट उतरत नसताना तिने प्रियंका यांना दरवाजातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. झटापटीदरम्यान संबंधित महिलेने प्रियंका यांच्या हाताला धरून त्यांच्या दंडाला जोरात चावा घेतला आणि बोट पिरगळले. या प्रकारात प्रियंका यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मात्र कामावर उशीर होऊ नये म्हणून त्यांनी अधिक वाद न घालता त्याच लोकलने प्रवास सुरू ठेवला.संध्याकाळी कामावरून परतल्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे तपासणी केली असता बोटाला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.