Sunidhi Chauhan : चाहत्याने पाण्याची बाटली फेकली, तरीही गात राहिली; सुनिधी चौहानने सांगितला लाइव्ह कॉन्सर्टमधील 'तो' किस्सा

Sunidhi Chauhan Live Concert : लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायिका सुनिधी चौहानवर चाहत्यांनी पाण्याची बाटली फेकली. त्यावर गायिकेने चाहत्यांना मिश्किल भाषेत उत्तर दिलं आहे. या प्रकरणावर सुनिधीने प्रतिक्रिया दिली आहे.
Sunidhi Chauhan Live Concert
Sunidhi Chauhan Live ConcertSaam Tv

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांमध्ये सुनिधी चौहानचं नाव आवर्जुन घेतलं जातं. सुनिधीच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्री अनेकदा लाईव्ह कॉन्सर्टला उपस्थिती लावत असते. नुकतंच अभिनेत्रीच्या गाण्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट झाला. यावेळी कॉन्सर्ट दरम्यान अभिनेत्रीवर पाण्याची बॉटल फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला. सुनिधीने मुलाखतीमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान काय किस्सा घडला ? यावर भाष्य केले. नुकतंच अभिनेत्रीने हिंदुस्थान टाईम्स वेबसाईटला मुलाखत दिली आहे.

Sunidhi Chauhan Live Concert
Actor Bernard Hill Dies : 'टायटॅनिक' चित्रपटातला कॅप्टन काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नुकतंच सुनिधीचा म्युझिक लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. यावेळी तिची झलक पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी उपस्खिती लावली होती. कॉन्सर्टवेळी एका चाहत्याने अभिनेत्रीवर चक्क पाण्याची बाटली फेकून मारली आहे. सोशल मीडियावर सुनिधीच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. गायिकेसोबत घडलेल्या ह्या प्रकरणाबद्दल अभिनेत्रीने नुकतंच हिंदुस्थान टाईम्सला अभिनेत्रीने मुलाखत दिली आहे. मुलाखतीमध्ये ती म्हणाली, "या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होईल, असा मला अंदाज आला होता. पण माझ्यासोबत ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. चाहत्याने माझ्यावर जाणूनबुजून बॉटल फेकली नव्हती.

मुलाखतीमध्ये सुनिधी पुढे म्हणाली, "मी माझं शेवटचं गाणं सादर करत होते आणि कॉन्सर्टला आलेल्या चाहत्यांमध्ये त्यांची त्यांची मस्ती सुरू होती. त्यांनी मस्ती मस्तीमध्येच ती बॉटल हवेत फेकली. तितक्यातच माझ्याजवळ दुसरीकडून एक बॉटल स्टेजवर पडली. बाटलीत पाणी असल्याने ती जास्त लांब आली नाही. तितक्यात मी 'हे काय सुरू आहे ? शो थांबेल' त्यांना असं म्हणाले. त्यावर चाहत्यांनी 'नाही, प्लीज शो बंद करू नका' असं मला उत्तर दिलं." (Bollywood News)

Sunidhi Chauhan Live Concert
Mouni Roy : दिवसाला तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अभिनेत्री 'या' आजाराने होती त्रस्त

या हल्ल्यामध्ये मला कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी प्रतिक्रिया दिली. पुढे ती म्हणाली, "हवेत फेकलेली ती बॉटल माझ्या मायक्रोफोवर येऊन जोरात पडली. माझ्या तोंडासमोर माईक असल्यामुळे मी थोडक्यात बचावले. जर माझ्याकडे माईक नसते तर माझ्या तोंडाला नक्कीच दुखापत झाली असती. अनेकांनी मुद्दाम कलाकारांच्या अंगावर वस्तू फेकल्या होत्या. पण कलाकारांना मिळत असलेली ही वागणूक फार चुकीची आहे." सुनिधीसह यापूर्वी अनेक सिंगरवर हल्ले झालेले आहेत. (Entertainment News)

Sunidhi Chauhan Live Concert
Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com