Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचं ब्रेकअप झाल्याची सध्या चर्चा सुरू आहे. दोघांच्याही बेस्ट फ्रेंडने त्यांच्या ब्रेकअपबद्दल सांगितले आहे.
Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup
Ananya Panday Aditya Roy Kapur BreakupInstagram

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. दोघेही अनेकदा स्पेशल स्क्रिनिंगला असो किंवा एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसतात. अशातच या कपलच्या रिलेशनबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. काही वर्षे एकमेकांना एकत्रित डेट केल्यानंतर यांच्या आता ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup
Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणखी एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार, दिग्गज स्टारकास्टसोबत करणार स्क्रिन शेअर

आदित्य आणि अनन्याचा ब्रेकअप एका महिन्यापूर्वीच ब्रेकअप झाल्याची माहिती दोघांच्याही एका कॉमन फ्रेंडने दिलेली आहे. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, ‘आदित्य आणि अनन्याचा एक महिन्यापूर्वीच ब्रेकअप झाला आहे. त्यांचं एकमेकांसोबतचे नातं खूप चांगलं होतं. त्यांच्या ब्रेकअपची माहिती आम्हाला सर्वांसाठीच खूप धक्कादायक होती.’ असं तो म्हणाला आहे. अनन्या आणि आदित्य यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तेव्हापासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू आहे. खरोखरंच आदित्य आणि अनन्याचं ब्रेकअप झालाय अद्याप याबद्दलची माहिती कळू शकलेली नाही.

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा चर्चेत राहिलेल्या आहेत. दोघांनीही रिलेशनबद्दल केव्हाही अधिकृतरित्या भाष्य केलेले नव्हते. पण असं असलं तरीही ते अनेकदा, स्क्रिनिंगवेळी किंवा पार्टीला एकत्र उपस्थित राहिले होते.

अनन्या आणि आदित्यच्या डेटिंगच्या चर्चांना 'कॉफी विथ करण'च्या ७व्या सीझनपासून सुरुवात झाली होती. शो दरम्यान अनन्या पांडे तिच्या नात्याबद्दल बोलली होती, तेव्हा करण जोहरने आदित्यसोबतच्या तिच्या नात्याबद्दल संकेत दिले होते.

'कॉफी विथ करण'च्या ८व्या सीझनमध्येही करणने अनन्याला प्रश्न विचारला होता की, तू आदित्य रॉय कपूरला डेट करते आहेस का? यावर तिनं "यावर काहीच बोलायचं नाही." असं उत्तर दिलं होतं.

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup
Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com