Mouni Roy : दिवसाला तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अभिनेत्री 'या' आजाराने होती त्रस्त

Mouni Roy Health Update : अभिनेत्री मौनी रॉय एकता कपूरच्या ‘नागिन’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. या सिरीयलची ऑफर येण्याआधी अभिनेत्री एका गंभीर आजारामुळे त्रस्त होती. असा खुलासा तिने स्वत: एका मुलाखतीमध्ये केलेला आहे.
Mouni Roy Health Update
Mouni Roy Health UpdateInstagram

बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये मौनी रॉयची गणना केली जाते. तिने सिरीयल, चित्रपट आणि वेबसीरीज अशा तिनही माध्यमांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. मौनी रॉयला सर्वाधिक प्रसिद्धी एकता कपूरच्या ‘नागिन’ मालिकेतून मिळाली आहे. या सिरीयलची ऑफर येण्याआधी मौनी एका गंभीर आजारामुळे त्रस्त होती. असा खुलासा अभिनेत्रीने स्वत: एका मुलाखतीमध्ये केलेला आहे.

Mouni Roy Health Update
Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मौनी रॉयने तिच्या हेल्थबद्दल सांगितले आहे, " 'नागिन' मालिका सुरू होण्याआधी मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर होते. जिथे मला वाटलं होतं की, माझं आयुष्य आता संपलं आहे. त्यावेळी मी थोडी आजारी होते.‘झलक दिखला जा ९’नंतर माझी L-4 आणि L-5 याचा माझ्या पाठीच्या कण्याला त्रास झाला होता. त्यामुळे मला व्यवस्थित उभंही राहता येत नव्हतं."

"ज्यावेळी मला 'नागिन'ची ऑफर आली होती, तेव्हा मी खूप आजारी होते. त्यामुळे माझं वजनही खूप वाढले होते. मी दिवसाला ३० गोळ्या घ्यायचे आणि कधी कधी इंजेक्शन्सही घ्यायचे. माझ्या मणक्यामध्ये एपिड्युरल होते. ते दिवस माझ्यासाठी फार वाईट होते. मी जवळजवळ तीन महिने अंथरुणावरच होते आणि तेव्हाच मला ‘नागिन’ची ऑफर आली होती."

मौनी रॉयच्या कामाबद्दल बोलायचे तर, "ब्रह्मास्त्र", "गोल्ड" चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. तर "नागिन" आणि "देवों के देव महादेव" मालिकेतही प्रमुख भूमिका साकारली आहे.

Mouni Roy Health Update
Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणखी एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार, दिग्गज स्टारकास्टसोबत करणार स्क्रिन शेअर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com