Shreya Maskar
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या तिचा आगामी चित्रपट 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 30 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच तिचा 'आशा' चित्रपट आला, जो सुपरहिट ठरला.
रिंकू राजगुरुच्य आयुष्याविषयी जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडते. तिचा साधा स्वभाव, उत्तम अभिनय याने ती प्रेक्षकांना आपलीशी करते. 'सैराट' चित्रपटात आपल्या प्रेमासाठी लढणाऱ्या आर्चीचे खऱ्या आयुष्यातील जोडीदाराविषयी, प्रेमाविषयी मत जाणून घेऊयात.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रिंकू राजगुरुने आपल्या ब्रेकअप विषयी सांगितले आहे. तसेच तिला कसा जोडीदार हवा यावरही तिने मन मोकळ्या गप्पा मारल्या आहेत.
रिंकूने मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, रिंकू आता सिंगल आहे. भूतकाळात तिला एक मुलगा आवडला होता. ती म्हणाली की, "एक मुलगा आवडलेला पण आता आमचे रस्ते स्वत:साठी मोकळे आहेत..."
प्रेमाबद्दल बोलताना रिंकू म्हणाली, "प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे, पण सगळ्यात जास्त भीती मला आता प्रेमाचीच वाटते...पण माझा प्रेमावर विश्वास आहे...सिच्युएनशिपमध्ये मी वेडी होईन. मी प्रेम केले तर आरपार करते..."
रिंकू म्हणाली, "मी रिलेशनशिपमध्ये असेल तर त्या व्यक्तीसोबत पूर्णपणे गुंतलेली असते... पण आजकाल कोणीही कोणत्याही कारणावरून सोडून जातो..."
रिंकूला प्रेमाची भीती वाटते. ती म्हणते, "प्रेम केले तर ते टिकेल का? मला कोणी सोडून जाणार नाही ना? याची भीती वाटते. त्यामुळे माणसांची आणि प्रेमाची आजकाल मला भीती वाटते..."
रिंकू शेवटी म्हणाली, "मला फॅमिली मॅन सारखा मुलगा जोडीदार म्हणून हवा आहे. तो कुटुंबाचा आणि माणसाचा आदर करणारा हवा...तो फक्त माझा असावा..."