Shreya Maskar
'ओ रोमिओ' चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 ला रिलीज झाला आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
'व्हॅलेंटाईन डे'च्या पार्श्वभूमीवर चित्रपट पाहायला प्रेक्षकांची गर्दी दिसत आहे. 'ओ रोमिओ' अॅक्शन-थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट आहे.
'ओ रोमियो' चित्रपटाचे बजेट जवळपास 120-150 कोटी रुपये आहे. 'ओ रोमियो' चे निर्माते विशाल भारद्वाज आहेत.
'ओ रोमियो' चित्रपटात शाहिद कपूर, तृप्ती डिमरीसोबतच नाना पाटेकर , रणदीप हुडा , दिशा पटानी हे कलाकार देखील झळकले आहेत.
Sacnilkच्या रिपोर्टनुसार, शाहिद कपूरच्या चित्रपटाने दोन दिवसांत तब्बल 20.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'ओ रोमियो' चित्रपटाचे ओटीटी राइट्स प्राइम व्हिडिओने विकत घेतले आहेत. चित्रपट थिएटर गाजवल्यानंतर ओटीटीवर पाहता येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'ओ रोमियो' चित्रपट मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे रिलीज डेट समोर आली नाही.
'ओ रोमियो' चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. तसेच चित्रपटातील शाहिद आणि तृप्तीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.