Shreya Maskar
2013 ला सर्वांचा आवडता 'यह जवानी है दीवानी' हा चित्रपट रिलीज झाला. यात दीपिका पादुकोण, रणबीर कपूर हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत.
बॉलिवूडची सुपरहिट जोडी शाहरुख खान आणि काजोल यांचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपट 1995 ला रिलीज झाला. यातील राज आणि सिमरन यांची लव्ह स्टोरी आजही खूप गाजते.
'आशिकी' चित्रपट 1990 ला रिलीज झाला. यात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल रोमँटिक अंदाजात दिसले. चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
2007 साली रिलीज झालेला 'जब वी मेट' चित्रपटात करीना कपूर खान आणि शाहिद कपूर झळकले. एका ट्रेनच्या प्रवासापासून यांच्या लव्ह स्टोरी सुरू होते.
1999 साली रिलीज झालेला 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट पाहून आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येते. यात सलमान खान आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत झळकले.हा चित्रपट प्रेम, त्याग याचा खरा अर्थ सांगते.
2000 मध्ये रिलीज झालेल्या 'मोहब्बतें' चित्रपटात 4 लव्ह स्टोरी दाखवल्या आहेत. यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहेत.
2007 साली रिलीज झालेल्या 'ओम शांती ओम' चित्रपटातून दीपिका पादुकोणने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. यात ती शाहरुख खानसोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाली.
1998 साली 'कुछ कुछ होता है' हे प्रदर्शित झाला. यात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत झळकली. ही एक सुंदर लव्ह स्टोरी आहे. यात प्रेमाचा Triangle पाहायला मिळाला.