Shreya Maskar
'नागिन' फेम सुरभी ज्योतीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लग्नाच्या दीड वर्षांनी अभिनेत्री आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. तिने एक खास पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
सुरभी ज्योतीने 27 ऑक्टोबर 2024 ला बॉयफ्रेंड सुमित सूरीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांनी इकोफ्रेंडली विवाहसोहळा केला.
सुरभी आणि सुमितने डेस्टिनेशन वेडिंग केले. त्यांनी उत्तराखंडातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कची यासाठी निवड केली. सुरभी ज्योतीने जिम कॉर्बेट प्राणी संग्रहालयातील आहना रिसॉर्टमध्ये सुमित सूरीसोबत लग्न केले आहे.
सुरभीने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका बाजूला तिचे पाय, दुसऱ्या बाजूला तिच्या नवऱ्याचे पाय आणि मध्ये मधोमध छोट्या बाळाचे बूट ठेवलेले दिसत आहेत.
सुरभीने फोटोला खूप खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "आमचे सर्वात मोठे Adventure सुरू होत आहे... Little Love जूनमध्ये येत आहे..."
सुरभी आणि सुमितच्या घरी जून महिन्यात नवीन पाहुणा येणार आहे. सुरभी लवकरच एका गोंडस बाळाची आई होणार आहे.
सुरभीने शेअर केलेल्या फोटोवर चाहते, कलाकार मंडळी आणि कुटुंबातील सदस्य प्रेमाचा वर्षाव करत आहे. त्यांना नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.
सुरभी अनेक हिट मालिका केल्या आहेत. तिची 'नागिन' आणि 'कुबूल है' हे शो खूप गाजले आहेत. चाहते आता तिच्या बाळाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.