Shreya Maskar
साऊथ अभिनेत्री श्रीलीलाने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. श्रीलीलाने एमबीबीएस पदवी मिळवली आहे. श्रीलीला आता एक डॉक्टर बनली आहे.
श्रीलीलाने प्रसिद्ध मुंबईच्या 'डी. वाय. पाटील विद्यापीठा'तून एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. 10 फेब्रुवारी 2026ला तिची ग्रॅज्युएशन सेरेमनी पार पडली.
ग्रॅज्युएशन सेरेमनीने फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यात श्रीलीला प्राध्यापकांकडून पदवी स्वीकारताना दिसत आहे. श्रीलीला खूपच खुश दिसत आहे.
श्रीलीलाने कन्नड, तेलुगु आणि हिंदी इंडस्ट्री गाजवली आहे. तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनसोबत ती किसिक (kissik ) या गाण्यात झळकली.
श्रीलीला 2020च्या बॅचची विद्यार्थिनी आहे. अभिनयासोबत तब्बल 6 वर्ष ती डॉक्टरकीचा अभ्यास करत होती. सध्या चाहते तिला Beauty With Brain करून बोलावत आहेत.
सध्या कलाकार आणि चाहते श्रीलीला तिने मिळवलेल्या यशासाठी शुभेच्छा देताना, तिचे कौतुक करताना दिसत आहेत. तसेच तिच्या आगामी प्रोजेक्टची देखील उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
श्रीलीला आता 24 वर्षांची आहे. श्रीलीला लवकरच बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबत 'तू मेरी जिंदगी है' आणि 'आशिकी 3'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, श्रीलीलाने 2017 चा तेलुगू चित्रपट 'चित्रांगदा' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, ज्यामध्ये तिने सिंधू तोलानीच्या व्यक्तिरेखेची छोटी आवृत्ती साकारली होती, परंतु मुख्य अभिनेत्री म्हणून तिचा पहिला चित्रपट 2019 चा कन्नड चित्रपट 'किस' होता.