Marathi Famous Couple : "प्रेमाला हळदीचा रंग लागला..."; प्रसिद्ध मराठी जोडपं लवकरच अडकणार लग्न बंधनात, पाहा PHOTOS

Shreya Maskar

लाडकी जोडी

मराठी टेलिव्हिजन सृष्टीतील प्रसिद्ध जोडपे अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झाली आहे.

Vishal - Akshhaya haldi | instagram

'बिग बॉस मराठी 3' चा विजेता

विशाल निकम हा 'बिग बॉस मराठी 3' चा विजेता आहे. बिग बॉसच्या घरात असताना त्यांने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र मुलीचे नाव गुलदस्त्यात ठेवले होते. अलिकडेच विशालने आपल्या आयुष्यातील सौंदर्या, सखी दुसरी-तिसरी कोणी नसून अभिनेत्री अक्षया हिंदळकर असल्याचे सांगितले.

Vishal - Akshhaya haldi | instagram

विशाल-अक्षया हळद

"आज प्रेमाला हळदीचा रंग लागला..." असे कॅप्शन देत विशाल-अक्षयाने हळदी समारंभाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये त्यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

Vishal - Akshhaya haldi | instagram

हळदीचा लूक

हळदीसाठी अक्षयाने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. हातात हिरवी चुडा, नाकात नथ आणि साज श्रृंगार करून तिने हा लूक पूर्ण केला आहे. तर विशालने विशालने व्हाईट कुर्ता परिधान केला आहे.

Vishal - Akshhaya haldi | instagram

साखरपुडा

विशाल-अक्षया यांनी हरिद्वारमध्ये साखरपुडा केला. ज्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

Vishal - Akshhaya haldi | instagram

चाहता वर्ग

हळदीच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. नेटकरी त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांच्या लूकचे कौतुक करताना दिसत आहेत.

Vishal - Akshhaya haldi | instagram

अक्षया हिंदळकर वर्कफ्रंट

'साता जन्माच्या गाठी' या मराठी मालिकेत अक्षया हिंदळकर आणि विशाल निकमने एकत्र काम केले होते. अक्षया हिंदळकरने 'तुझ्या इश्काचा नादखुळा', 'साता जन्माच्या गाठी', 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकांमध्ये काम केले आहे.

Vishal - Akshhaya haldi | instagram

विशाल निकम वर्कफ्रंट

विशाल निकम सध्या तो 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत मुख्य हिरोच्या भूमिकेत दिसत आहे. यात त्याने रायाची भूमिका साकारली. तसेच विशालने देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Vishal - Akshhaya haldi | instagram

NEXT : "देवानं तुला माझ्यासाठी..."; बिग बॉसच्या विजेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, पाहा PHOTOS

Famous Marathi Actor | instagram
येथे क्लिक करा...