Shreya Maskar
'बिग बॉस मराठी 3' विजेता विशाल निकम लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकताच त्याने गुपचूप साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मराठी अभिनेता विशाल निकम याने अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत साखरपुडा केला आहे. दोघे खूप वेळापासून एकमेकांना डेट करत आहेत. टिव्हीची ही प्रसिद्ध जोडी आता नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे.
विशाल आणि अक्षयाने साखरपुड्यासाठी पारंपरिक लूक केला होता. दोघांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला. अक्षयाच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत.
विशालने केशरी रंगाचा कुर्ता, धोतर परिधान केले होते. तर डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी घातली आहे. विशाल खूपच हँडसम दिसत आहे.
अक्षयाने हिरव्या रंगाची सुंदर काठापदराची साडी नेसली आहे. मोकळे केस, हातात हिरवा चुडा, गोल्डन ज्वेलरी आणि ग्लॉसी मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
विशाल निकमने फोटोंना खूपच भावुक कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "देव खरंच माझ्या बाजूने होता जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिलं..."
विशाल निकमच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. अक्षया आणि विशालचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नेटकरी त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
'साता जन्माच्या गाठी' या मराठी मालिकेत अक्षया हिंदळकर आणि विशाल निकमने एकत्र काम केले होते. विशाल निकम सध्या तो 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत मुख्य हिरोच्या भूमिकेत दिसत आहे. यात त्याने रायाची भूमिका साकारली.अक्षया हिंदळकरने 'तुझ्या इश्काचा नादखुळा', 'साता जन्माच्या गाठी', 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकांमध्ये काम केले आहे.