Shreya Maskar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया हिंदळकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अक्षया हिंदळकर आणि विशाल निकम खूप वेळापासून एकमेकांना डेट करत आहेत.
अक्षया हिंदळकरचा लग्ना आधीच्या समारंभांना सुरूवात झाली आहे नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अक्षयाने मेहंदी कार्यक्रमासाठी पारंपरिक लूक केला आहे. तिने इरकल साडीचा ड्रेस परिधान केला आहे. लाल रंगाच्या ड्रेसला हिरवा काठ पाहायला मिळत आहे. ड्रेसवरील नक्षीकाम खूपच सुंदर आहे.
अक्षयाच्या हातावर विशालच्या नावाची मेहंदी रंगली आहे. तिने एका हातावर 'सखी' लिहिलं आहे. तर दुसऱ्या हातावर उडणारे फुलपाखरू काढले आहे.
अक्षया हिंदळकरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "विशाल निकम aye सखी माझ्या मेहंदीमध्ये तुझं नावं शोधायला तयार रहा..."
अक्षया हिंदळकरने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. अक्षया आणि विशालचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
'साता जन्माच्या गाठी' या मराठी मालिकेत अक्षया हिंदळकर आणि विशाल निकमने एकत्र काम केले होते. विशाल निकम सध्या तो 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत मुख्य हिरोच्या भूमिकेत दिसत आहे. यात त्याने रायाची भूमिका साकारली.
'बिग बॉस मराठी 3' विजेता विशाल निकमने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. 'तुझ्या इश्काचा नादखुळा', 'साता जन्माच्या गाठी', 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकांमध्ये काम केले आहे.