Saiyaara Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saiyaara Box Office Collection: 'सैयारा'ने मोडला शाहिद कपूरच्या या चित्रपटाचा रेकॉर्ड; १४व्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Saiyaara Box Office Collection Day 14: 'सैयारा' प्रेक्षकांना खूप आवडत आहे. चित्रपटातील अनित पड्डा आणि अहान पांडे यांच्या जोडीचे खूप कौतुक करण्यात येत आहे.

Shruti Vilas Kadam

Saiyaara Box Office Collection Day 14: यशराजच्या बॅनरखाली बनलेला 'सैयारा' हा चित्रपट मोहित सुरी यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मोहित सुरीचा 'सैयारा' हा चित्रपट १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या रोमँटिक चित्रपटाद्वारे अहान पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात अहानसोबत अभिनेत्री अनिता पड्डा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. दरम्यान, 'सैयारा'च्या १४ व्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहेत. तर मग गुरुवारी चित्रपटाने किती कोटींची कमाई केली ते पाहूया.

'सैयारा'ने कबीर सिंगला मागे टाकले

'सैयारा' प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चित्रपटात अहान पांडेसोबत अनिता पड्डा यांची जोडीने प्रेक्षकांची मने पूर्णपणे जिंकली आहे. नवीन स्टार्सच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र सुरु आहे. 'सैयारा'ला समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'सैयारा' सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत १९ व्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी कबीर सिंग १९ व्या क्रमांकावर होता. आता 'सैयारा'ने शाहिद कपूरच्या चित्रपटालाही मागे टाकले असून २०१९ मध्ये आलेल्या शाहिदच्या 'कबीर सिंग'ने जगभरात ३७७ कोटी आणि भारतात २८०.५० कोटींचा व्यवसाय केला होता. मात्र, सॅकनिल्कच्या मते, आता 'सैयारा'ने हा विक्रम मोडला आहे.

१४ व्या दिवशी इतके कोटी कमवले

'सैयारा'ने पहिल्या दिवशी २१ कोटींची मोठी कमाई केली. आता गुरुवारचे कलेक्शन समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, १४ व्या दिवशी 'सैयारा'ने ६.५० कोटी रुपये कमावले आहेत. तर, आतापर्यंत एकूण २८०.५० कोटी रुपये कलेक्शन झाले आहे.

'सैयारा'चा टोटल कलेक्शन

दिवस १- २१.५ कोटी रुपये

दिवस २-२६ कोटी रुपये

दिवस ३- ३५.७५ कोटी रुपये

दिवस ४- २४ कोटी रुपये

दिवस ५- २५ कोटी रुपये

दिवस ६- २१.५ कोटी रुपये

दिवस ७- १९ कोटी रुपये

दिवस ८- १८ कोटी रुपये

दिवस ९- २६.५ कोटी रुपये

दिवस १०- ३० कोटी रुपये

दिवस ११- ९.२५ कोटी रुपये

दिवस १२- १० कोटी रुपये

दिवस १३- ७.५ कोटी रुपये

दिवस १४- ६.५० कोटी रुपये

एकूण कलेक्शन - २८०.५० कोटी रुपये

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी जरूर करावेत 'हे' उपाय; सूर्य देव प्रसन्न होऊन देतील आशिर्वाद

Maharashtra Live News Update : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर 'नाईट रायडर' बारवर मनसेची मध्यरात्री धडक

Umbrella Fall : भंडारदऱ्याच्या कुशीत लपलेला अंब्रेला फॉल्स, मोजक्या लोकांना माहितीये

Meghana Bordikar Video : ग्रामसेवकाला धमकी का दिली? मेघना बोर्डीकरांचे स्पष्टीकरण, मंत्री काय म्हणाल्या...

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या मोलकरणीच्या मुली बेपत्ता; FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT