Riteish - Raja Shivaji Collection  saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish - Raja Shivaji Collection : झुकेगा नहीं साला! दुसऱ्या आठवड्यातही 'राजा शिवाजी'चा दबदबा; रितेश भाऊ मालामाल, कमावले तब्बल 'इतके' कोटी

Raja Shivaji Box Office Collection Day 8 : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने एका आठवड्यात किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' ने आठवड्याभरात 65 कोटी पार कमाई केली आहे.

अजय-अतुलच्या संगीताने चित्रपट गाजला आहे.

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट आता रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. चित्रपटाने एका आठवड्यात बंपर कमाई केली आहे. अजय-अतुलच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगण्यात आली आहे. चित्रपटाने ८ दिवसांत ग्रॉस कलेक्शन तब्बल ७० कोटी रुपये केले आहे. चित्रपटाची ८ व्या दिवसाची एकूण कमाई जाणून घेऊयात. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ८

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी म्हणजे ८ व्या दिवशी ३,८८२ शोजमधून ३.२० कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत चित्रपटाची भारतातील एकूण निव्वळ कमाई ५५.८५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर एकूण ग्रॉस कमाई ६६.२३ कोटी रुपयांवर गेली आहे.

  • दिवस १ (हिंदी): ३.३५ कोटी रुपये; (मराठी): ८ कोटी रुपये

  • दिवस २ (हिंदी): ३.४० कोटी रुपये; (मराठी): ७.१५ कोटी रुपये

  • दिवस ३ (हिंदी): ४.२५ कोटी रुपये; (मराठी): ७.७५ कोटी रुपये

  • दिवस ४ (हिंदी): १.३५ कोटी रुपये; (मराठी): ४.२५ कोटी रुपये

  • दिवस ५ (हिंदी): १.५५ कोटी रुपये; (मराठी): ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ६ (हिंदी): १.२५ कोटी रुपये; (मराठी): ३ कोटी रुपये

  • दिवस ७ (हिंदी): १.२५ कोटी रुपये; (मराठी): २.७५ कोटी रुपये

  • दिवस ८ (हिंदी): ०.७० कोटी रुपये; (मराठी): २.५० कोटी रुपये

  • एकूण: ५५.८५ कोटी रुपये

'राजा शिवाजी' स्टार कास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख झळकला आहे. तर सईबाईंची भूमिका जिनिलियाने साकारली आहे. अफजल खानच्या भूमिकेत संजय दत्त दिसला आहे. तसेच चित्रपटात अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते आणि जितेंद्र जोशी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

SCROLL FOR NEXT