Riteish - Raja Shivaji Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' चे बॉक्स ऑफिसवर वादळ; रितेश देशमुखच्या ऐतिहासिक चित्रपटाची रविवारी बक्कळ कमाई, वाचा कलेक्शन

Raja Shivaji Box Office Collection Day 24 : 'राजा शिवाजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. चित्रपटाने तीन आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. चौथ्या आठवड्यात चित्रपटाने किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' मराठीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

'राजा शिवाजी' १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' हा रितेशच्या करिअरमधील मोठा चित्रपट ठरला.

रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट 'राजा शिवाजी'चा चौथा आठवडा सुरू आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे (महाराष्ट्र दिन) ला रिलीज झाला आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत रितेश भाऊ झळकले आहेत. चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाचे बॉक्स ऑफिसचे २४ दिवसांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 24

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, २४ व्या दिवशी 'राजा शिवाजी' चित्रपटाने ९५० शोजमधून ₹१.३० कोटींचे नेट कमाई केली आहे. आतापर्यंतचे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ₹१०८.७८ कोटींवर तर एकूण नेट कमाई ₹९२.०७ कोटींवर पोहोचली आहे.परदेशात या चित्रपटाने एकूण ₹४.२२ कोटींचे ग्रॉस कमाई मिळवून जगभरातील एकूण व्यवसाय ₹११३.०० कोटींवर पोहोचला आहे. लवकरच चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठणार असल्याचे दिसत आहे.

'राजा शिवाजी' ओटीटी अपडेट

'राजा शिवाजी' चित्रपटाला आता १ महिना होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची चर्चा पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट जिओ हॉटस्टारवर या ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळू शकतो असे बोले जात आहे. मात्र अद्याप ओटीटी प्लेटफॉर्म आणि ओटीटी रिलीज डेट याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

'राजा शिवाजी' स्टारकास्ट

'राजा शिवाजी' चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला आहे. त्यामुळे चित्रपटात दोन्ही कलाकार झळकले आहेत. रितेश देशमुखसोबत चित्रपटात जिनिलिया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. तसेच संजय दत्त, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री, सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर हे कलाकार झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

Mughal history India: शाइस्ताखानचे खरं नाव काय होतं तुम्हाला माहितीये का?

Monsoon Picnic Spot: पावसाळ्यात महाराष्ट्रातल्या या ७ बेस्ट ठिकाणी नक्की करा फिरायला जायचा प्लॅन

Vasai Shocking : फुटबॉल कोचकडून सलग ३ वर्ष अल्पवयीन मुलीवर बलात्कार; क्रीडा क्षेत्रात खळबळ

तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT