Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची यशस्वी घोडदौड; २२व्या दिवशीही छप्परफाड कमाई, वर्ल्डवाइड कलेक्शन किती?

Raja Shivaji Box Office Collection Day 22 : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने तीन आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाने २२ व्या दिवशी किती कमावले, पाहूया.
Raja Shivaji Box Office Collection Day 22
Riteish - Raja Shivaji Collectionsaam tv
Published On
Summary

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' चित्रपटाने जगभरात १०० कोटी पार कमाई केले.

'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश भाऊंनी शिवरायांची भूमिका साकारली.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने तीन आठवड्यात बंपर कमाई केली आहे. आता चित्रपटाचा चौथा आठवडा सुरू झाला आहे. 'राजा शिवाजी' ची क्रेझ वाढताना दिसत आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला आहे. चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच 'राजा शिवाजी' मराठीत सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'राजा शिवाजी' ने चौथ्या शुक्रवारी म्हणजे २२ व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमावला जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 22

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने जगभरात जवळपास 114.80 कोटी रुपये कलेक्शन केले आहे. भारतातील नेट कमाई 89.55 कोटींवर पोहचली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चौथ्या आठवड्यात (शुक्रवारी) चित्रपटाने अंदाजे 60 लाख रुपयांची कमाई केली आहे. तसेच २१ व्या दिवशी सिनेमाने 85 लाख रुपये कमावले. ज्यामुळे 'राजा शिवाजी'चे २२ दिवसांची नेट कमाई जवळपास 89.55 कोटी रुपये झाली आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट आता लवकरच १०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.

'राजा शिवाजी' ओटीटी अपडेट

मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट जिओ हॉटस्टारवर या ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळू शकतो असे बोले जात आहे. मात्र अद्याप ओटीटी प्लेटफॉर्म आणि ओटीटी रिलीज डेट याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

'राजा शिवाजी' चित्रपट थिएटरमध्ये मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' हा चित्रपट ७५-१०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटात सलमान खान, जिनिलिया, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन असे अनेक कलाकार झळकले आहेत.

Raja Shivaji Box Office Collection Day 22
Pravin Tarde- Deool Band 3 : राघव शास्त्रीला स्वामींचा अमेरिकेत फोन; 'देऊळ बंद ३' येणार, गश्मीर महाजनीची दमदार एन्ट्री | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com