Riteish - Raja Shivaji Collection :'राजा शिवाजी'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, रितेश भाऊंच्या ऐतिहासिक चित्रपटाची १९ व्या दिवशीही तगडी कमाई

Raja Shivaji Box Office Collection Day 19 : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. १९ व्या दिवशी किती कमावले, जाणून घेऊयात.
Raja Shivaji Box Office Collection Day 19
Riteish - Raja Shivaji CollectionSAAM TV
Published On
Summary

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' चित्रपटातून शिवरायांची यशोगाथा दाखवण्यात आली आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटाने मराठी भाषेत बक्कळ कमाई केली.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला जगभरातून भरपूर प्रेम मिळाले आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाने तीन आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटातून महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख पुन्हा एक मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले. या चित्रपटात त्यांच्या मुलाने देखील काम केले आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. 'राजा शिवाजी' हिंदी आणि मराठी भाषेत रिलीज झाला. 'राजा शिवाजी' मराठी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाची १९ व्या दिवसाची कमाई, जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १९

'राजा शिवाजी' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ५२.६५ कोटी रुपयांची कमाई केली तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या एकूण कमाईमध्ये २४.३० कोटी रुपयांची भर पडली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, १९ व्या दिवशी 'राजा शिवाजी'च्या कमाईमध्ये मागील दिवसाच्या तुलनेत १३% वाढ दिसून आली. १९ व्या दिवशी २,१५२ शोजमधून या चित्रपटाने १.३० कोटी रुपयांची कमाई केली. यापैकी मराठी आवृत्तीने १.१० कोटी रुपये आणि हिंदी आवृत्तीने ०.२० कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कमाई १०२.९० कोटी रुपयांवर पोहोचली असून, भारतातील एकूण नेट कमाई आता ८७ कोटी रुपयांवर स्थिरावली आहे.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने १९ व्या दिवशी परदेशात ०.१० कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे परदेशातील एकूण 'ग्रॉस' कमाई ४.१० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे चित्रपटाची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई १०७ कोटी रुपयांवर गेली आहे.

  • पहिला आठवडा (हिंदी): १६.४० कोटी रुपये; (मराठी): ३६.२५ कोटी रुपये

  • दुसरा आठवडा (हिंदी): ५.९७ कोटी रुपये; (मराठी): १८.३ कोटी रुपये

  • १५ वा दिवस (हिंदी): ०.२० कोटी रुपये; (मराठी): १.२५ कोटी रुपये

  • १६ वा दिवस (हिंदी): ०.४० कोटी रुपये; (मराठी): २.३० कोटी रुपये

  • १७ वा दिवस (हिंदी): ०.५५ कोटी रुपये; (मराठी): २.९० कोटी

  • १८ वा दिवस (हिंदी): ०.१५ कोटी रुपये; (मराठी): १ कोटी

  • १९ वा दिवस (हिंदी): ०.२० कोटी रुपये; (मराठी): १.१० कोटी

  • एकूण: ८७ कोटी रुपये

'राजा शिवाजी' चित्रपटाने 'सैराट' या मराठी चित्रपटाला मागे टाकले आहे. 'राजा शिवाजी' हा रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग ऐकून अंगावर काटा येतो. चित्रपटातील गाणी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली आहेत. तसेच चित्रपटात मराठी आणि हिंदी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, विद्या बालन असे अनेक कलाकार झळकले आहेत.

Raja Shivaji Box Office Collection Day 19
Mouni Roy : दिशा पटानीमुळे मौनी रॉयचा Divorce झाला? घटस्फोटावर सूरज पहिल्यांदाच बोलला, वाचा नेमकं काय म्हणाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com