Raja Shivaji : "राजा शिवाजी पाहण्याआधीच बाबा गेले...", रितेश देशमुखसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीने व्यक्त केली खंत | VIDEO

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie : रितेशच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात मराठी आणि हिंदी अनेक कलाकार झळकले आहेत. चित्रपटातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने खुलासा केला की, चित्रपट पाहण्याआधीच तिच्या बाबांचे निधन झाले.
Riteish Deshmukh Raja Shivaji Movie
Raja Shivaji saam tv
Published On
Summary

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' चित्रपटात मराठी आणि हिंदी कलाकार झळकले.

'राजा शिवाजी' फेम अभिनेत्रीने खंत व्यक्त करत सांगितले की, "चित्रपट पाहण्याआधीच बाबा गेले..."

रितेश भाऊंचा 'राजा शिवाजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट रिलीज होऊन दोन आठवडे झाले तरी तिसऱ्या आठवड्यात 'राजा शिवाजी' ची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटाने हिंदी आणि मराठी कलाकार पाहायला मिळाले. या चित्रपटात अफझल खानच्या बायकोची भूमिका मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिने साकारली. तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र तिच्या बाबांना हा चित्रपट पाहता आला नाही, सिनेमा पाहण्याआधीच त्यांचे निधन झाले.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री दिशा परदेशी म्हणाली की, "बाबांनी राजा शिवाजी चित्रपट नाही पाहिला, ही एक छोटी खंत राहून गेली. बिल्डिंगमधले फ्रेंड्स आईला घेऊन चित्रपट पाहायला गेले. तेव्हा आईने बाबांना विचारेल चला तुम्ही पण,आमच्याकडे एक छोटेसे कुत्र्‍याचे पिल्लू आहे. तेव्हा बाबा म्हणाले याला कोण सांभाळणार, त्यामुळे तुम्ही जा, मी नंतर जाईन. त्यामुळे मी ठरवले की पुढच्या आठवड्यात बाबांना घेऊन चित्रपट पाहायला जाईन, कारण या आठवड्यात चित्रपट, मुलाखती, पब्लिकेशन कामात व्यस्त होते. सतत मी बाहेर पडत होते. लोकांना भेटत होते. फोन चालू होते. नवीन प्रोजेक्टच्या मीटिंग चालू होत्या. त्यामुळे माझ्या डोक्यात आले की बाबांनी नाही पाहिला ना 'राजा शिवाजी' मग पुढच्या आठवड्यात सोमवारी, मंगळवारी बाबांना चित्रपट पाहायला घेऊन जाते. आम्ही दोघे पिक्चर पाहू. कारण माझ्याहून जास्त हे एवढ मोठं स्वप्न माझ्या बाबांचे आहे. आई-बाबांनी लहानपणापासून या इंडस्ट्रीत राहण्यासाठी मला पाठिंबा दिला आहे. पण स्वप्न हे माझ्या बाबांचे आहे. पण शनिवारीच बाबा गेले. त्यांनी चित्रपटाची प्रक्रिया पाहिली. लोकांना फोन करून करून सांगत होते की, आपल्याला राजा शिवाजी पाहायचाय...ते सांगत होते माझी मुलगी पण आहे त्यात..."

अभिनेत्री दिशा परदेशी ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती 'लाखात एक आमचा दादा आणि 'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा' या मालिकांमध्ये झळकली. 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या निमित्ताने दिशाला अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

'राजा शिवाजी' कलेक्शन

'राजा शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रितेश देशमुख याने केली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई १००.०७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे तर भारतातील एकूण नेट कमाई ८४.५५ कोटी रुपये इतकी झाली.

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie
Famous Singer Death : संगीत विश्वावर शोककळा; दिग्गज गायकाचे निधन, मूत्रपिंडाच्या आजाराशी सुरू होती झुंज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com