'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.
'राजा शिवाजी' सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.
'राजा शिवाजी' ने 'सैराट'ला मागे टाकले.
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने १०० कोटींपार कमाई केली आहे. 'राजा शिवाजी' छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. या चित्रपटात हिंदी आणि मराठी कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळत आहे. 'राजा शिवाजी' १ मे ला रिलीज झाला आहे. रितेश देशमुखने 'राजा शिवाजी' च्या कमाईची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. चित्रपटाचे १८ व्या दिवसांचे कलेक्शन जाणून घेऊयात.
रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असलेल्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 57.7 कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या आठवड्यात या कमाईत आणखी 27 कोटी रुपयांची भर पडली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, १८ व्या दिवशी 'राजा शिवाजी' चित्रपटाने २,१६५ शोमधून १.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८ दिवसांत 93.1 कोटी कमावले. 'राजा शिवाजी' चित्रपटाने भारत १०९.९ कोटी कमावले आहेत. तर परदेशात ४.९ कोटी कमावले.
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' ने 'सैराट'ला मागे टाकले आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.'सैराट'ने सुमारे एक दशकापर्यंत ११० कोटी रुपयांच्या जागतिक कमाईचा विक्रम आपल्या नावे राखला होता; मात्र, 'राजा शिवाजी'ने जगभरात ११४ कोटींहून अधिक कमाई करत हा टप्पा पार केला आणि तो विक्रम मोडीत काढला.
मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट जिओ हॉटस्टारवर या ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळू शकतो असे बोले जात आहे. मात्र अद्याप ओटीटी प्लेटफॉर्म आणि ओटीटी रिलीज डेट याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.