Rashmika-Vijay Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Rashmika-Vijay Wedding : रश्मिका-विजयच्या लग्नाला सेलिब्रिटींची मांदियाळी, 'VIROSH'ला आशीर्वाद द्यायला कोण-कोण पोहचले उदयपूरला?

Rashmika-Vijay Wedding Guest List : रश्मिका-विजयच्या शाही विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटी लग्नासाठी उदयपूरला पोहचताना दिसत आहेत.

Shreya Maskar

रश्मिका-विजय 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

रश्मिका-विजयच्या लग्नात सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

कलाकार, मित्रमंडळी 'विरोश'च्या लग्नासाठी उदयपूरला पोहचले.

सध्या सोशल मीडियावर फक्त 'विरोश' (VIROSH) च्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. चाहते या शाही लग्न सोहळ्यासाठी खूपच उत्सुक आहेत. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे साऊथ इंडस्ट्रीचे पावर कपल आहे. हा लग्न सोहळा खूप खाजगी ठेवण्यात आला आहे. अशात आता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नासाठी सेलिब्रिटींची मांदियाळी उदयपूरला पाहायला मिळत आहे. रश्मिका-विजयचे जवळचे लोक लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उदयपूरला पोहचले आहेत.

सेलिब्रिटींची मांदियाळी

उदयपूरमध्ये पोहोचलेल्यांमध्ये चित्रपट निर्माते थरुन भास्कर, 'द गर्लफ्रेंड'चे दिग्दर्शक राहुल रवींद्रन आणि अभिनेत्री ईशा रेब्बा यांचा समावेश आहे. हे विमानतळावर स्टायलिस्ट श्रव्या वर्मा यांच्यासोबत दिसले. त्यासोबतच अभिनेत्री आशिका रंगनाथ देखील उदयपूरला स्पॉट झाली आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, संदीप रेड्डी वांगा यांच्यासह जवळच्या व्यक्तींना लग्नाचे आमंत्रण देण्यात आले आहे. या शाही लग्न सोहळ्याला अल्लू अर्जुन, सलमान खान, करण जोहर, विकी कौशल, कृती सेनन आणि रणबीर कपूर हे कलाकार सहभागी होऊ शकतात.फक्त 100 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले असल्याचे बोले जात आहे.

रश्मिका-विजय 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारीला कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या मेहंदी समारंभ पार पडला. त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी हळदी आणि संगीत समारंभ होणार आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला. लग्नाचे रिसेप्शन 4 मार्चला थाटामाटात पार पडणार आहे. लग्न सोहळा आणि रिसेप्शन दोन्ही हैदराबादमध्ये होणार आहे.

रश्मिका आणि विजयचा रॉयल लग्न सोहळा राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडणार आहे. उदयपूर जवळील 'आयटीसी मेमेंटोस' या लग्जरी हॉटेलमध्ये त्यांचे लग्न होणार आहे. लग्नाआधीच्या समारंभांना सुरुवात झाली आहे. रश्मिका आणि विजय सोशल मीडियावर फोटो पोस्टकरून याची छोटी झलक चाहत्यांसाठी शेअर करत आहेत. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 2018 ला रिलीज झालेल्या 'गीता गोविंदम' आणि 2019 साली 'डियर कॉमरेड' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातने शक्तिपीठ महामार्गाजवळ खरेदी केली जमीन, महत्वाचे कागद आले समोर

Pune : पुण्यात रेस्क्यू केलेल्या १३ बांगलादेशी मुली पळाल्या, केअरटेकर अन् सुरक्षारकावर हल्ला केला नंतर...; VIDEO समोर

Actress Divorce: लग्नाच्या १४ वर्षांचा संसार मोडला; अभिनेत्रीने घेतली नाही पोटगी, एक्स पतीवर केले गंभीर आरोप

Blood Pressure: घरच्या घरी BP मोजताना लक्षात ठेवा हे ५ नियम, अन्यथा रीडिंगमध्ये दिसतील बदल; वाचा डॉक्टरांचा सल्ला

Yoga For Belly Fat Loss: पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल, घरीच करा हे ५ सोपे योगा प्रकार

SCROLL FOR NEXT