बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला.
रुचिता टोळीच्या विरोधात जाते.
रुचिताने विरोध केल्याने विशालला मोठा धक्का बसतो.
'बिग बॉस मराठी 6' च्या घरात सातवा आठवडा सुरू झाला आहे. बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. नुकताच याचा खास प्रोमो समोर आला आहे. या आठवड्यात तन्वी कोलते घराची कॅप्टन असल्यामुळे ती नॉमिनेशन पासून सुरक्षित आहे. तर Power Key मिळाल्यामुळे प्रभू आणि अनुश्री देखील या आठवड्यात सुरक्षित आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये शेवटच्या क्षणी रुचिता टोळीच्या विरोधात जाते. जे पाहून विशालला मोठा धक्का बसतो.
नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांच्या गळ्यात एकमेकांच्या फोटोंच्या पाट्या दिसतात. ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे. त्याची पाटी गळ्यातून काढून टाकावी लागते. असा खेळ आहे. मात्र यात एक वेगळाच पेच पाहायला मिळत आहे. ज्यामुळे रुचिता स्वार्थी होते आणि स्वतःसाठी खेळताना दिसते. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओला खास कॅप्शन दिलं आहे. लिहिलं की, "बिग बॉसच्या रेसमध्ये सदस्यांना लागणार Nomination चा लगाम..."
सागरच्या गळ्यात दिपालीचा फोटो
रुचिताच्या गळ्यात राकेशचा फोटो
विशालच्या गळ्यात सागरचा फोटो
राखीच्या गळ्यात प्राजक्ताचा फोटो
रोशनच्या गळ्यात राखीचा फोटो
दिपालीच्या गळ्यात रुचिताचा फोटो
प्राजक्ताच्या गळ्यात विशालचा फोटो
राकेशच्या गळ्यात रोशनचा फोटो
रुचिताच्या गळ्यात राकेशचा फोटो तर दिपालीच्या गळ्यात रुचिताचा फोटो आहे. रुचिता आणि दिपालीमध्ये एकमेकांचे फोटो न टाकण्याची डील होते. कारण दिपाली आणि राकेश सुरुवातीपासून चांगली मित्र आहेत. मात्र विशाल रुचिताला राकेशला नॉमिनेट करायला सांगतो, मात्र ती नकार देते. त्यामुळे प्राजक्ता, सागर, विशाल सर्वांना धक्का बसतो.
आता सातव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील किती सदस्य नॉमिनेट होता आणि कोण घराबाहेर जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.