Varsha Usgaonkar : धावत्या मेट्रोमध्ये फॅशन शो; मराठमोळ्या अभिनेत्रीनं केलं रॅम्प वॉक, प्रवाशांचे भान हरपले

Varsha Usgaonkar Ramp Walk In Metro : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी मेट्रोमध्ये सुंदर रॅम्प वॉक केला आहे. प्रवासी त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.
Varsha Usgaonkar Ramp Walk In Metro
Varsha Usgaonkarsaam tv
Published On
Summary

वर्षा उसगांवकर हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे.

मेट्रोमध्ये फॅशनशोचे आयोजन करण्यात आले.

वर्षा उसगांवकर यांनी चालत्या मेट्रोमध्ये सुंदर रॅम्प वॉक केला.

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर कायम आपल्या अभिनयसाठी चर्चेत असतात. त्यांच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्यांनी 'बिग बॉस मराठी 5'मध्ये देखील भाग घेतला होता. त्यांचा घरातील खेळ चाहत्यांना खूप आवडला. अशात आता वर्षा उसगांवकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्या मेट्रोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहे. त्यांच्या कातिल अदांकडे प्रवासी पाहतच राहीले आहेत.

नागपूरमध्ये चालत्या मेट्रोमध्ये फॅशनशोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी उपस्थिती लावली. त्यांचा रॅम्प वॉक करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.या शोमध्ये नवीन डिझायनर्सनी डिझाइन केलेले सुंदर कपडे परिधान करून मॉडेल्सनी मेट्रोच्या डब्यात रॅम्प वॉक केला. डब्यातील प्रवाशांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. तसेच वर्षा उसगांवकर यांनी देखील सर्वांचे आभार मानले आणि डिझायनर्सचे कौतुक देखील केले.

फॅशन शो मध्ये 8 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतच्या महिला-पुरुषांनी सहभाग घेतला होता. विविध फॅशन इन्स्टिट्यूट मधील नवोदित मॉडेलनी चालत्या ट्रेनमध्ये केलेला रॅम्प वॉक पाहून प्रवासी थक्क झाले. प्रवाशांनी मॉडेल्सचे भरपूर कौतुक देखील केले. 'सेलिब्रेशन ऑन व्हील' या उपक्रमाअंतर्गत महामेट्रो शुल्क आकारून अशा कार्यक्रमाना परवानगी देत असते.

फॅशन शोसाठी वर्षा उसगांवकर यांनी सुंदर पिवळ्या आणि काळ्या रंगाची साडी नेसली होती. मोकळे केस, मिनिमल मेकअप, गोल्डन ज्वेलरी घालून त्यांनी लूक पूर्ण केला होता. चालत्या मेट्रोमध्ये रॅम्प वॉक करताना त्याचा आत्मविश्वास कमालीचा होता. तसेच त्यांनी रॅम्प वॉक करताना प्रवाशांशी संवादही साधला. त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य पाहायला मिळाले. चाहते आता वर्षा उसगांवकर यांच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Varsha Usgaonkar Ramp Walk In Metro
Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन, शेअर केली भावुक पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com