Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Thamma vs Ek Deewane ki Deewaniyat : 'थामा'ची मंगळवारी बक्कळ कमाई; 100 कोटींचा आकडा पार, मोडला 'हा' रेकॉर्ड

Thamma vs Ek Deewane ki Deewaniyat Box Office Collection : 'थामा'चा हिरो आयुष्मान खुराना याने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 'थामा' आणि 'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'थामा'ने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'थामा'मध्ये मुख्य भूमिकेत रश्मिका मंदाना, आयुष्मान खुराना झळकले आहेत.

'एक दिवाने की दिवानियत'च्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस घट होत आहेत.

रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुरानासोबत 'थामा' (Thamma) चित्रपटात 21 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. याच दिवशी 'सनम तेरी कसम' फेम अभिनेता हर्षवर्धन राणेचा 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपट प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा पूर्ण झाला आहे. 'थामा' ने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'थामा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी 'थामा' ने 5.50 कोटी रुपये कमाई केली, ज्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 101.3 कोटी रुपये झाले. यासह, चित्रपटाने वरुण धवन आणि कृती सॅनन यांच्या भेडिया (2022) ला मागे टाकले आहे. ज्याने भारतात 68.99 कोटी रुपये आणि जगभरात 94.91 कोटी रुपये कमावले होते. 'थामा' हा आयुष्मान खुरानाचा पाचवा 100 कोटी पार करणारा चित्रपट ठरला आहे. तो लवकरच 'ड्रीम गर्ल 2'चा रेकॉर्ड ब्रेक करेल.

  • दिवस पहिला- 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 18.6 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 13 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 10 कोटी रुपये

  • दिवस पाचवा - 13.1 कोटी रुपये

  • दिवस सहावा- 12.6 कोटी रुपये

  • दिवस सातवा- 4 कोटी रुपये

  • दिवस आठवा - 5.50 कोटी रुपये

  • एकूण - 101.3 कोटी रुपये

'एक दिवाने की दिवानियत' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 8

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी 'एक दिवाने की दिवानियत'ने 4.35 कोटी रुपये कमाई केली, ज्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 49.35 कोटी रुपये झाले.

  • दिवस पहिला- 9 कोटी रुपये

  • दिवस दुसरा- 7.75 कोटी रुपये

  • दिवस तिसरा- 6 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 5.5 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 6.25 कोटी रुपये

  • दिवस सहावा- 7 कोटी रुपये

  • दिवस सातवा- 3.5 कोटी रुपये

  • दिवस आठवा - 4.35 कोटी रुपये

  • एकूण - 49.35 कोटी रुपये

'थामा' चित्रपटात रश्मिका मंदाना, आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी सप्तमी गौड़ा, डायना पेंटी, वरुण धवन, संजय दत्त, अपारशक्ती खुराणा हे कलाकार झळकले असून ही एक हॉरर-कॉमेडी-लव्ह स्टोरी आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन राणेसोबत सोनम बाजवा 'एक दीवाने की दीवानियत' मध्ये झळकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT