येणाऱ्या शुक्रवारी चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळणार आहे.
31 ऑक्टोबरला महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' रिलीज होतो आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटासोबतच येणाऱ्या शुक्रवारी आणखी दोन मराठी चित्रपट रिलीज होणार आहे.
मराठी कलाविश्वाकडून पुन्हा एकदा तीच चूक केली जात आहे. हिंदी चित्रपटासमोर मराठी चित्रपट टिकत नाही, सिनेमा हॉल मिळेत नाही, हे माहिती असतानाही मराठी चित्रपट रिलीज केले जातात. त्याशिवाय एकाचवेळी एकापेक्षा जास्त मराठी चित्रपट रिलीज करण्याची चूकही मराठी कलाविश्वाकडून केली जात आहे. हीच चूक पुन्हा एकदा करण्यात आली आहे. येणाऱ्या शुक्रवारी ३ मराठी चित्रपट रिलीज होत आहेत. त्यासोबत दोन हिंदी चित्रपटही झळकणार आहेत. 'कांतारा', 'थामा', 'एक दीवाने की दीवानियत' हे चित्रपट तिकिट खिडकीवर पैसा छापत आहेत. त्यात तीन मराठी चित्रपट रिलीज करून पायावर दगड मारला असेच म्हणावे लागेल.
येत्या शुक्रवारी म्हणजेच 31 ऑक्टोबर 2025 ला तीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या कथानकाला केंद्रित करतात. यात 'Well Done आई', 'तू माझा किनारा' आणि 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटांचा समावेश आहे. हे तिन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहे. त्यामुळे चित्रपटांवर नेमकं कसा परिणाम होणार? कोणता चालणार किंवा कोणता फ्लॉप ठरणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
यापूर्वी 12 सप्टेंबर 2025ला प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा 'बिन लग्नाची गोष्ट', ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांचा 'आरपार' आणि जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा 'दशावतार' असे तीन चित्रपट रिलीज झाले होते. यातील 'दशावतार' चित्रपट आजही थिएटर गाजवत आहे. मात्र 'आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' चित्रपटांना हवे तसे यश मिळाले नाही. एकाच दिवशी तीन चित्रपट रिलीज केल्यामुळे हा परिणाम दिसून आला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आता पुन्हा एकदा तीच चूक होताना दिसत आहे.
'Well Done आई' या चित्रपटात मराठ अभिनेत्री विशाखा सुभेदार मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट आई आणि मुलांच्या नात्याचा प्रवास दाखवणारा आहे. लेकरांवर जिवापाड प्रेम करणारी आई, कुटुंबासाठी अहोरात्र झटणारी आई यात दाखवली आहे. या चित्रपटात भावनिक तर आहेच त्यासोबत कॉमेडीचा तडकाही पाहायला मिळणार आहे.
'तू माझा किनारा' चित्रपटात भूषण प्रधान, केतकी नारायण आणि केया इंगळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून बाप-लेकीचे अबोल नाते उलघडताना दिसत आहे. ही एक फॅमिली चित्रपट आहे. चित्रपटाची गाणी खूपच सुंदर आहेत.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटात मुख्य भूमिकेत सिद्धार्थ बोडके झळकणार आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा महेश मांजरेकरांचा चित्रपट आहे. या चित्रपटातून एक ऐतिहासिक प्रवास उलगडणार आहे. चित्रपट रिलीज आधी खूप वेळ वादाच्या भोवऱ्यात होता.
31 ऑक्टोबर 2025 (शुक्रवारी) हिंदीतही दोन चित्रपट रिलीज होत आहेत. ज्यात परेश रावल यांचा 'द ताज स्टोरी' आणि हुमा कुरेशी , श्रेयस तळपदेचा 'सिंगल सलमा' या चित्रपटांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.