Shreya Maskar
'थामा' चित्रपट 21 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'थामा' चित्रपटातून पहिल्यांदाच रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
'थामा' हा हॉरर-कॉमेडी- लव्ह स्टोरी चित्रपट आहे. 'थामा' चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे.
DNA ने दिलेल्या रिपोर्टनुसार 'थामा' चित्रपटातील कलाकारांचे मानधन जाणून घेऊयात.
'थामा' चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका आयुष्मान खुराना याने साकारली आहे. या चित्रपटासाठी आयुष्मानने तब्बल 8-10 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
'थामा' चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिकेत रश्मिका मंदाना झळकली आहे. रश्मिकाने या भूमिकेसाठी 5-7 कोटी फी घेतली आहे.
शक्तिशाली व्हॅम्पायर किंगच्या भूमिकेत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पाहायला मिळाला. याला 'थामा' चित्रपटासाठी 3-4 कोटी रुपये मिळाले.
तसेच चित्रपटात झळकलेले अभिनेते परेश रावल आणि अभिनेत्री मलायका अरोरा 2 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
'थामा' चित्रपटात एका डान्ससाठी नोरा फतेहीने तब्बल 1 कोटी रुपये फी घेतली आहे. तिच्या डान्सचे लाखो चाहते दिवाने आहेत.