Shreya Maskar
मराठी अभिनेत्री अनुजा साठे हिने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
अनुजा साठे हिने दिवाळी नवीन घरात प्रवेश केला आहे. तिने आलिशान नवीन घर खरेदी केले आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले आहेत.
अनुजा साठेने फोटोंना खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "ऑक्टोबर आता चांगला झाला, दिवाळीच्या शुभेच्छा..." अनुजा साठेने मुंबईत हक्काचे घर घेतले आहे.
अनुजाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून प्रेमाचा, कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अनुजाने गृहप्रवेशाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोंवमध्ये ती गृहप्रवेशाच्या विधी करताना दिसत आहे. तसेच या आनंदाच्या क्षणी तिचे कुटुंब आणि काही खास मित्रमंडळी पाहताना दिसत आहेत.
अनुजाची खास मैत्रीण अभिज्ञा भावे देखील या कार्यक्रमाला आली होती. अनुजाने तिच्या सोबतचा देखील सुंदर फोटो शेअर केला आहे.
अनुजा साठेने आजवर मराठी-हिंदी मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिज यांच्यामध्ये काम केले आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
'लगोरी' या लोकप्रिय मालिकेतून अनुजा साठेला खूप लोकप्रियता मिळाली. अनुजा साठे आणि सौरभ गोखले हे मनोरंजनसृष्टीतील क्यूट कपल आहे.