Shreya Maskar
लोकप्रिय मराठी अभिनेता शशांक केतकरने एका खास अंदाजात चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छां दिल्या आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या मुलांचे चेहरे दाखवले आहेत.
शशांक केतकर दोन मुलं आहेत. पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी. मुलाचे नाव ऋग्वेद आणि मुलीचे नाव राधा आहे.
ऋग्वेद आणि राधाने यंदा आपली पहिलीच भाऊबीज केली आहे. शशांक केतकरने चार फोटो शेअर केले आहेत.
दोन फोटोंमध्ये शशांक केतकर बायको आणि मुलांसोबत पाहायला मिळत आहे. तर बाकी दोन फोटोंमध्ये ऋग्वेद आपल्या बहिणीला मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहे. दोघे खूपच क्यूट आहेत.
शशांकने फोटोंना खूप खास कॅप्शन दिल आहे. त्याने लिहिलं की, "आनंदाचे झाड दारी झुलते डहाळी, केतकर कुटुंबाकडून दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..."
शशांकने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते कमेंट करून मुलांचे कौतुक करताना दिसत आहेत. शशांकचा परफेक्ट फॅमिली फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे.
चाहत्यांनी राधाचे गोंडस रुप खूपच आवडले आहे. सर्वजण तिच्या गोंडस रुपाचे कौतुक करत आहेत.
शशांक केतकरने 2017 ला दुसरे लग्न केले. त्याने आपली मैत्रीण प्रियांका ढवळे सोबत लग्नगाठ बांधली. शशांकचे पहिले लग्न अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत झाले होते.