Shreya Maskar
आज बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा वाढदिवस आहे. आज अभिनेत्री 77 वर्षांच्या झाल्या आहेत.
हेमा मालिनी यांचा मुंबईतील जुहू येथे आलिशान बंगला आहे. तसेच वृंदावन येथे देखील त्यांचा प्रॉपर्टी आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.
हेमा मालिनी यांच्याकडे लग्जरी कार कलेक्शन आहे. ज्यात एमजी, ऑडी मर्सिडीज यांचा समावेश आहे. या सर्व कार कोटींच्या घरात आहेत.
हेमा मालिनी यांच्या मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट म्हणजे 1968 मध्ये रिलीज झालेला 'सपनों का सौदागर' आहे. या चित्रपटात त्यांनी राज कपूर यांच्यासोबत काम केले होते.
हेमा मालिनी चित्रपट, ब्रँड जाहिराती, रिअल इस्टेट गुंतवणुकीतून पैसा कमावतात. तसेच त्यांची राजकीय कारकीर्द देखील आहे.
1980 मध्ये हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. दोघांच्याही अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती सुमारे 123.6 कोटी रुपयांच्यावर आहे. त्या एक लग्जरी आयुष्य जगत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांच्याकडे जवळपास 450 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते बॉलिवूडचे सुपरस्टार आहे.