Shreya Maskar
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी नुकतीच दिवाळी पार्टी पार पडली. या पार्टीत बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या मनमोहक अंदाजात चारचाँद लावले. यात सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली.
दिवाळी पार्टी मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे बॉलिवूडचे रोमँटिक कपल तारा सुतारिया आणि वीर पहाडिया. दोघेही एकत्र खूपच सुंदर दिसत होते. त्यांच्या लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांनी हातात हात घालून रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. दोघांच्या केमिस्ट्रीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसले.
वीर पहाडिया आणि तारा सुतारिया दोघांनीही सोशल मीडियावर आपले सुंदर दिवाळी पार्टीच्या लूकमधील फोटो शेअर केले आहे. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीचे चाहते कौतुक करत आहे.
तारा सुतारियाच्या हॉट लूकची तर सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. तिने गोल्डन, चमकदार लेहेंगा परिधान केला होता.मॅचिंग दुपट्टा आणि ऑफ शोल्डर ब्लाउजमध्ये तारा गॅमरस दिसत होती.
तारा मोकळे केस, डायमंड ज्वेलरी, हाय हिल्स आणि ग्लॉसी मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तर वीरने पांढऱ्या रंगाचा व्ही-नेक कुर्ता-पायजमा परिधान केला होता. त्यावर सुंदर हिरव्या नेकलेस दिसत होता.
गेल्या अनेक महिन्यांपासून हे जोडपे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. दोघे अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट होतात. तसेच मात्र अद्याप या दोघांनी यांच्या नात्यांची कोणतीच अधिकृत घोषणा केली नाही. मात्र चाहत्यांना ही जोडी खूप आवडते.
वीर पहाडिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. हे एक प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील आहे. वीर पहाडियाने 'स्काय फोर्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.