Shreya Maskar
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहेत. तिने समुद्रकिनारी भन्नाट फोटोशूट केले.
मुंबईत मरीन ड्राइव्हवर साडीत पोज देताना रिंकु दिसत आहे. पीच कलरची सुरेख साडी तिने नेसली आहे.
मोकळे केस, कपाळावर बिंदी, मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे. रिंकूसाडीत खरंच खूप सुंदर दिसत आहे.
रिंकूने फोटोंना खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "तुम्हाला इतरांसारखे जगायचे नाही, तुम्हाला स्वतःसारखे जगायचे आहे"
रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सुंदर, क्यूट, पाटील वाइब्स अशा कमेंट येत आहेत.
रिंकू राजगुरू आता लवकरच 'पुन्हा एकदा साडे माडे 3' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे,भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव पाहायला मिळणार आहे.
'पुन्हा एकदा साडे माडे 3' चित्रपट फुल कॉमेडी आहे. रिंकू राजगुरूचा हा नवीन चित्रपट 14 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.
यापूर्वी रिंकू राजगुरू 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यात तिने सुबोध भावे आणि प्रार्थना बहिरे यांच्यासोबत काम केले आहे.