Shreya Maskar
प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या लेकीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. लेकीने साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहे.
सुदेश भोसले यांनी आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजाचे चाहते दिवाने आहेत. त्यांचा सुरेल आवाज प्रेक्षकांना खूप आवडतो.
सुदेश भोसले यांच्या लेकीचे नाव श्रुती भोसले आहे. श्रुतीने अभिनेता प्रतीक देशमुखसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
श्रुतीचा होणारा नवरा आणि भोसले कुटुंबाचा जावई प्रतीक देशमुख हा उत्तम अभिनेता, लेखक, निर्माता आणि इंजिनिअर आहे.
श्रुती आणि प्रतीकने कुटुंबातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे. साखरपुड्यामध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.
श्रुतीने साखरपुड्याला गोल्डन सुंदर साडी नेसली होती. तर प्रतीकने गोल्डन रंगाचा कुर्ता परिधान केला होता. दोघेही साखपुड्याची अंगठी फ्लॉन्ट करताना फोटोमध्ये दिसत आहेत.
श्रुती आणि प्रतीकने फोटोंना "Now starring" असे कॅप्शन दिले आहे. सध्या श्रुती आणि प्रतीकवर कलाकार, मित्रमंडळी आणि कुटुंबाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
साखरपुड्यानंतर श्रुती आणि प्रतीकने एक सुंदर केक देखील कापला आहे. फोटोंमध्ये सुदेश भोसले आणि प्रतीक देशमुखचे कुटुंब दिसत आहे.