Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding Date Saam tv
मनोरंजन बातम्या

Rashmika-Vijay Wedding: तारीख ठरली! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार उडणार; उदयपूरमध्ये होणार शाही विवाह

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding Date: दक्षिण चित्रपटसृष्टीतील फेमस कपल रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा आता खरोखरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत का?

Shruti Vilas Kadam

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा फेब्रुवारीमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत.

राजस्थानमधील उदयपूर येथे होणार लग्न

चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding Date: दक्षिण चित्रपटसृष्टीतील फेमस कपल रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा आता खरोखरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत का? हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर ते खरं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. या कपलने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना खात्री पटली आहे.

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गेल्या महिन्यात हैदराबादमध्ये एक खाजगी समारंभ होता फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रांच्या उपस्थित साखरपुडा केला. सूत्रांनुसार, हा समारंभ अत्यंत साधेपणाने आणि पारंपारिक विधींनी पार पडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, त्यांचे शाही लग्न २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथील एका आलिशान राजवाड्यात होणार आहे.

सर्वांना माहिती आहे...

अलिकडेच, तिच्या आगामी चित्रपट 'थामा' च्या प्रमोशन दरम्यान, एका मुलाखतीत रश्मिकाला साखरपुड्याच्या अफवांबद्दल विचारले असता, ती हसत म्हणाली, "सर्वांना माहिती आहे, बरोबर..." या उत्तरामुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आणि #RashmikaVijayWedding सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. दरम्यान, विजयच्या टीमच्या जवळच्या सूत्रांनी पुष्टी केली की हे कपल पुढील वर्षी लग्नाची तयारी करत आहेत, पण तारखांबद्दल कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.

रिअल लव्ह

रश्मिका आणि विजय २०१८ मध्ये 'गीता गोविंदम' चित्रपटाच्या सेटवर भेटले. चित्रपटातील त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले. एका वर्षानंतर, ते 'डियर कॉम्रेड' (२०१९) मध्ये पुन्हा एकत्र आले, त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या अफवा पसरल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT