Actress Hospitalised: डिव्होर्सच्या चर्चेदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; 'या' आजारामुळे केलं रुग्णालयात दाखल

Mahhi Vij Hospitalised: अलिकडेच, माही विज आणि पती जय भानुशाली यांच्या डिव्होर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mahhi Vij Hospitalised
Mahhi Vij HospitalisedSaam Tv
Published On
Summary

टीव्ही अभिनेत्री माही विज डिव्होर्सच्या बातम्यांमुळे चर्चेत

माही विजची तब्येत बिघडली रुग्णालयात दाखल

मॅनेजर अवंतिका सिन्हाने दिली माहिती

Actress Hospitalised: टीव्ही अभिनेत्री माही विज तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीची तब्येत बिघडली आहे आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशा बातम्या येत आहेत. विरल भयानी यांच्या मते, माहीला तापामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. माहीची मॅनेजर अवंतिका सिन्हा यांनी अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली आहे. तिने सांगितले की माहीला तीव्र ताप आहे आणि विकेनेस आहे.

घटस्फोटामुळे बातम्यांमुळे चर्चेत

माही विज अलीकडेच तिचा पती जय भानुशालीपासून विभक्त झाल्याच्या कारणामुळे चर्चेत आली होती. माहीला जयकडून भरमसाठ पोटगी मिळत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. नंतर, माहीच्या एका जवळच्या मैत्रिणीने या अफवांचे खंडन केले. तसेच "नच बलिये ५" फेम माहीनेही एका व्हिडिओमध्ये हे दावे फेटाळून लावले.

Mahhi Vij Hospitalised
Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

इंस्टाग्राम स्टोरी

काही तासांपूर्वी माहीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर स्वतःचा एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये ती विंटर आऊटफिटमध्ये दिसली आजारी असल्याचे तिने वेगवेगळी औषधे घेत असतानाचा आणखी एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, "आजारी."

Mahhi Vij Hospitalised
Farah Khan: '…म्हणून फिल्म सेटवर कलाकार प्रेमात पडतात'; फराह खानने सांगितलं बॉलिवूडचं डार्क सिक्रेट

२०११ मध्ये लग्न झाले

माही विज आणि जय भानुशाली यांनी २०११ मध्ये लग्न केले. २०१७ मध्ये, या कपलने खुशी आणि राजवीर ही दोन मुले दत्तक घेतली. ऑगस्ट २०१९ मध्ये, या कपलने त्यांची मुलगी तारा हिचे स्वागत केले. १४ वर्षांच्या लग्नानंतर हे सुंदर कपल वेगळे होत असल्याचे वृत्त आहे. पण, तिने तिच्या गोपनीयतेची काळजी घेण्याचे आवाहन चाहते आणि नेटकऱ्यांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com