Honey Singh Divorce With Shalini Talwar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Honey Singh Divorce: हनी सिंगचा १२ वर्षांनंतर घटस्फोट; पत्नी शालिनी तलवारने केले होते गंभीर आरोप

Honey Singh And Shalini Talwar News: हनी सिंगचा लग्नाच्या १२ वर्षांनंतर घटस्फोट झाला आहे.

Chetan Bodke

Honey Singh Divorce With Shalini Talwar

सुप्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंग (Honey Singh) सध्या एका खासगी कारणामुळे चर्चेत आला आहे. हनी सिंगचा लग्नाच्या १२ वर्षांनंतर घटस्फोट झाला आहे. रॅपरची पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar) त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत घटस्फोट घेतला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने (Delhi Court) मंगळवारी हनी सिंग आणि शालिनी तलवारचा ७ नोव्हेंबर रोजी घटस्फोट मंजूर केला. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांच्यातला हा वाद सुरु होता, अखेर दोघांनीही ७ नोव्हेंबर रोजी घटस्फोट घेतला. शालिनी तलवारने हनी सिंगवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते.

हनी सिंग आणि शालिनी तलवारने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती. २०२१ मध्ये हनी सिंग आणि शालिनी यांनी घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. न्यायालयामध्ये शालिनीने हनी सिंहवर कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू होता. सुनावणी दरम्यान, दोघांनाही पुन्हा एकदा नात्यासाठी एक संधी दिली होती. त्यावेळी हनी सिंगने शालिनीसोबत राहण्यात काहीही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

शालिनीने रॅपर हनी सिंगवर आणि त्याच्या कुटुंबावर बरेच आरोप केले होते. कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक छळाबरोबर आर्थिक फसवणूक सुद्धा केल्याचा आरोप तिने केला होता. पण हनी सिंगने शालिनी तलवारचे सर्व आरोप फेटाळले होते. खरंतर हे दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. एकमेकांनी २० वर्ष डेट केल्यानंतर २०११ मध्ये त्यांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT