Delhi High Court: वृद्धाश्रमातील नागरिकांसाठी 'दिल्ली दर्शना'ची व्यवस्था करा; दिल्ली हायकोर्टाचे FIR रद्द करत आरोपींना आदेश

Delhi High Court News: साल २०२० मध्ये एका महिलेने आरोपी व्यक्तीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.
Delhi High Court
Delhi High CourtSaam TV
Published On

Delhi Darshan For Senior Citizens:

आयुष्यात काही चूका घडल्यानंतर त्या सुधारण्याची आरोपी अथवा काही गुन्हेगारांना चांगले काम करण्याची संधी मिळणे गरजेचे असते. बऱ्याच प्रकरणात चांगले काम करण्याची संधी दिली जाते. अशात दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत आरोपी व्यक्तीला वृद्धाश्रमातील नागरीकांसाठी दिल्ली दर्शनाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

Delhi High Court
High Court News: शरीरसंबंधाला जाणीवपूर्वक नकार देणं ही क्रूरता; घटस्फोट प्रकरणात हायकोर्टाचं मत

न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांनी या प्रकरणी सुनावणी दरम्यान हे आदेश दिले आहेत. साल २०२० मध्ये एका महिलेने आरोपी व्यक्तीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी आरोपीवर कलम ३५४, ३५४ब, ३४१ अशी विविध कलमे दाखल करण्यात आली होती.

यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी दोन्ही पक्षांमध्ये समजोता झाला. यावेळी महिलेने आपली याचिका मागे घेण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. महिलेच्या या निर्णयावर न्यायालयाने देखील हे प्रकरण सुरू ठेवले नाही. तसेच आरोपीवरील दाखल एफआयआर रद्द करण्यात आली.

यावेळी आरोपीला वृद्धाश्रमातील नागरिकांसाठी दिल्ली दर्शनाची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये वृद्धाश्रमातील व्यक्तींच्या प्रवासाचा खर्च, तसेच त्यांच्या सुविधेसाठी वैद्यकीय सेवा आणि सर्व प्रकारची काळजी घेण्यास सांगण्यात आली. किमान ४ तासांचे दिल्ली दर्शन देण्यात यावे असे आदेश देण्यात आले.

Delhi High Court
Hingoli Crime: मैत्रीला काळीमा! शिकारीला गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; मृतदेह लपवण्यासाठी मित्रांचे भयंकर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com