High Court News: शरीरसंबंधाला जाणीवपूर्वक नकार देणं ही क्रूरता; घटस्फोट प्रकरणात हायकोर्टाचं मत

Husband Wife Physical Relations: जाणूनबुजून आपल्या जोडीदाराला शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणं ही क्रूरता आहे, असं मत हायकोर्टाने नोंदवलं.
Delhi High Court Statement on Husband wife relations over divorce case
Delhi High Court Statement on Husband wife relations over divorce case Saam TV

High Court on Husband Wife Physical Relations

पती किंवा पत्नी जाणूनबुजून आपल्या जोडीदाराला शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत असेल तर ती मानसिक क्रूरता आहे, असं मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध न ठेवणे योग्य नाही, अशी टिप्पणी देखील हायकोर्टाने केली आहे. एका घटस्फोट याचिकेवर सुनावणी घेताना हायकोर्टाने हे मत नोंदवलं आहे. (Latest Marathi News)

Delhi High Court Statement on Husband wife relations over divorce case
Maratha Reservation: मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शिंदे सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’ मध्ये; घेतला महत्वाचा निर्णय

2004 मध्ये एका जोडप्याचं हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झालं होतं. लग्नानंतर नवरी माहेरी गेली. त्यानंतर ती परतलीच नाही. पत्नी सासरी यावी, म्हणून पतीने अनेकवेळा तिला बोलावणी धाडली. इतकंच नाही, तर तो तिला घ्यायला देखील गेला. मात्र, पत्नीने सासरी येण्यास नकार दिला. पत्नीच्या अशा वागण्याने पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.

दरम्यान, न्यायालयाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर घटस्फोट मंजूर केला. लग्नानंतर दोघांचाही 35 दिवसानंतर घटस्फोट झाला. कौटुंबिक न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पत्नीने दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) धाव घेतली. सासरची मंडळी हुंड्यासाठी आपला छळ करतात म्हणून मी माहेरी जात नाही, असं पत्नीने आपल्या याचिकेत म्हटलं.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर पत्नीचं असं वागणं चुकीचं आहे, असं मत न्यायालयाने नोंदवलं. त्याचबरोबर पत्नीने जाणून बुजून पतीला शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. तसेच कोणताही पुरावा नसूनही पती आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. ही एक क्रूरता आहे, असं मत न्यायालयाने नोंदवलं.

पत्नीने पतीविरोधात दाखल केली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. इतकंच नाही, तर हायकोर्टाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निर्णय देखील कायम ठेवला. दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

Edited by - Satish Daud

Delhi High Court Statement on Husband wife relations over divorce case
Parliament's Special Session: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर नव्या संसदेचा 'श्रीगणेशा'... आजपासून सुरू होणार कामकाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com