Randeep Hooda Lin Laishram Wedding Update Instagram
मनोरंजन बातम्या

Randeep Hooda Lin Laishram Wedding: अभिनेता रणदीप हुड्डा ४७व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार; तारीख आणि ठिकाणही ठरलं

Randeep Hooda Wedding Date: गेल्या अनेक दिवसांपासून रणदीप पर्सनल लाईफमुळे बराच चर्चेत आहे. लग्नाबद्दलचे अपडेट रणदीपने सोशल मीडियावरून शेअर केले आहे.

Chetan Bodke

Randeep Hooda Lin Laishram Wedding Update

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तो लग्नाच्या बोहल्यावर चढणार अशी चर्चा होत होती. अखेर त्याच्या लग्नाची तारीख समोर आली असून तो त्याची गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत मणिपूरमध्ये विवाहबंधनात (Randeep Hooda Marriage) अडकणार आहे.

मणिपूरमध्ये, २९ नोव्हेंबरला तो लग्नगाठ बांधणार आहे. मणिपूरच्या परंपरेनुसार त्याचा लग्नसोहळा पार पडणार आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसोबत लग्नाची तारीख शेअर केली आहे. रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम २९ नोव्हेंबरला मणिपूरच्या इंफाळमध्ये सप्तपदी घेत लग्नबंधनात अडकणार आहे. रणदीप गेल्या अनेक दिवसांपासून लिनला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत सुद्धा स्पॉट झाले होते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणदीप आणि लिना लग्नबंधनात अडकणार आहेत. (Bollywood Film)

रणदीप हुड्डाला त्याच्या पर्सनल लाईफबद्दल फारसं बोलायला आवडत नाही. त्याने अनेकदा योग्य वेळ आली की, मी सांगेल असे सांगितले होते. अखेर त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत लग्नाविषयीचे अपडेट शेअर केले आहे. पत्रिका शेअर करताना रणदीपने ‘आमच्याकडे आनंदाची बातमी आहे.’ असं म्हणत गुड न्यूज शेअर केली आहे. रणदीपच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगायचे झाले तर ती मणिपूरची रहिवासी आहे. ती पेशाने भारतीय मॉडेल असून दोघांमध्ये १० वर्षांचा फरक आहे. (Bollywood Actor)

रणदीप हुड्डाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, लवकरच तो 'स्वतंत्र वीर सावरकर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीपने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय रणदीप सय्यद अहमद अफजलच्या 'लाल रंग 2: खून चुसवा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Viral Video: बाईक स्टंटचा प्रयत्न जीवावर बेतला, तोंडावर आपटल्याने तरुण जखमी; VIDEO

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

SCROLL FOR NEXT