Randeep Hooda: रणदीप हु्ड्डा लवकरच बोहल्यावर चढणार, गर्लफ्रेंड लिनासोबत 'या' महिन्यात करणार लग्न

Randeep Hooda And Lin laishram Marriage: रणदीप आणि लिन यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
Randeep Hooda And Lin laishram
Randeep Hooda And Lin laishramSaam Tv
Published On

Randeep Hooda Marriage:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असतो. आता रणदीप हुड्डा पुन्हा चर्चेत आला आहे यामागचे कारण म्हणजे लवकरच रणदीप हुड्डा बोहल्यावर चढणार आहे. रणदीप गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत विवाहबंधनात (Randeep Hooda Marriage) अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता याच महिन्याच्या शेवटी लग्न करणार आहे. पण अद्याप अभिनेत्याने अधिकृत घोषणा केली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा त्याची गर्लफ्रेंड लिन लैशराम हिच्याशी या महिन्याच्या शेवटी एका खासगी समारंभात लग्न करणार आहे. नॉर्थ ईस्टमध्ये ते लग्न करणार आहेत. रणदीप आणि लिन यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नाची तारीख आणि ठिकाण अद्याप समोर आलेले नाही. लग्नाची तारीख आणि ठिकाण फायनल झाले आहेत. पण सुरक्षेच्या कारणास्तव ते सांगण्यात आले नाही.

रणदीप हुड्डाला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलणे आवडत नाही. याच कारणामुळे त्याला त्याच्या लग्नाकडे मीडियाचे लक्ष नको आहे. या कारणास्तव त्याने लग्नाशीसंबंधित अनेक तपशील गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य वेळ आल्यावर लग्नाशी संबंधित तपशील चाहत्यांशी शेअर करण्याचे अभिनेत्याने ठरवले आहे. रणदीपच्या लग्नाची बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Randeep Hooda And Lin laishram
Hardik Joshi: 'तुझ्यात जीव रंगला'चा राणादा पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, हार्दिक जोशी घेऊन येतोय नवाकोरा रिअ‍ॅलिटी शो

काही दिवसांपूर्वी रणदीपने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर करून आपल्या नात्याची घोषणा केली होती. लिनच्या वाढदिवसानिमित्त त्याने ही खास पोस्ट शेअर करत नात्याची कबुली दिली होती. रणदीप आणि लिन दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे मनमोहक फोटो शेअर करतात. रणदीपच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगायचे झाले तर ती मणिपूरची रहिवासी आहे. ती भारतीय मॉडेल आहे. लिन रणदीपपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

Randeep Hooda And Lin laishram
Bigg Boss 17: 'फॅमिली शो असा असतो का?', कॅमेऱ्यासमोर ईशा आणि समर्थने केले लिपलॉक, व्हिडीओ पाहून नेटिझन्स संतप्त

रणदीप हुड्डाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच तो 'स्वतंत्र वीर सावरकर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीपने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. याशिवाय रणदीप सय्यद अहमद अफजलच्या 'लाल रंग 2: खून चुसवा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2016 मध्ये आलेल्या 'लाल रंग' या चित्रपटाचा हा सिक्वेल असलेल्या शंकराच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे.

Randeep Hooda And Lin laishram
Hou de Dhingana 2 Show: 'मेहनतीचं असं फळ मिळालं की बरं वाटतं', TRP च्या शर्यतीत सिद्धार्थ जाधवचा ‘आता होऊदे धिंगाणा २’ ठरला नंबर १

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com