Randeep Hooda In Depression: अक्षय कुमारमुळे ३ वर्षे डिप्रेशनमध्ये होता रणदीप हुड्डा, अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा

Randeep Hooda Movie: रणदीप हुड्डाच्या 'बॅटल ऑफ सारागढी' या चित्रपटाची घोषणा २०१६ साली झाली होती.
Randeep Hooda
Randeep HoodaInstagram @randeephooda
Published On

Randeep Hooda Spoke About His Depression:

अभिनेता रणदीप हुड्डा त्याचा चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. रणदीप हुड्डाच्या चित्रपटांचे विषय आणि आशय खूप सुंदर असतात. रणदीपचा फॅशन सेन्स देखील कमाल आहे. नुकताच एका मुलखतीत रणदीप हुड्डाने त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा शेअर केला आहे.

रणदीप हुड्डाने मॅशबल इंडियाच्या मुलाखतीत सांगितले की, अक्षय कुमारच्या एका चित्रपटामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. रणदीपने एका चित्रपसाठी तीन वर्षे मेहनत केली होती. परंतु तो चित्रपट अक्षय कुमारमुळे कचऱ्यात गेला.'

Randeep Hooda
Amitabh Bachchan Warn Contestant: 'कौन बनेगा करोडपती'च्या नावाखाली फसवणूक, अमिताभ बच्चन यांनी 'KBC'च्या स्पर्धकांना केलं अलर्ट

रणदीप हुड्डाच्या 'बॅटल ऑफ सारागढी' या चित्रपटाची घोषणा २०१६ साली झाली होती. २०१८ साली अक्षय कुमारचा 'केसरी' या चित्रपटाची घोषणा झाली. तसेच हा चित्रपट रिलीज देखील झाला. 'केसरी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केली. 'केसरी' आणि 'बॅटल ऑफ सारागढी' या दोन्ही चित्रपटांची कथा सारखीच होती. परंतु केसरी आधीच प्रदर्शित झाल्याने रणदीप हुड्डाची तीन वर्षाची मेहनत वाया गेली.

रणदीप हुड्डाने सांगितले की, मी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. तीन वर्षे मी दाढी आणि केस वाढवले होते. परंतु चित्रपट प्रेक्षकांसमोर आलाच नाही. या चित्रपटासाठी मी इतर अनेक चित्रपट नाकारले. या चित्रपटाच्या पात्रामध्ये मी पूर्णपणे गुंतून गेलो होतो. आता मी ठरवलं आहे की असे चित्रपट करायचे नाही. मी त्या पात्रांमध्ये खूप इन्व्हॉल्व्ह होतो आणि अशा चित्रपटांना कोण विचारात देखील नाही.'

तीन वर्षे चित्रपटावर मेहनत घेतल्यानंतर चित्रपट प्रदर्शित न झाल्याने रणदीप हुड्डा खूप निराश झाला होता. त्याने स्वतःला खोलीत कोंडून देखील घेतले होते. त्याचे आई-वडील त्याला एकटं राहू देत नव्हते. ते सतत त्याच्यासोबत असायचे.

रणदीप हुड्डा आता 'वीर सावरकर' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यासह रणदीप हुड्डाचे 'पछत्तर का छोकरा', 'तेरा क्या होगा लव्हली' हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com