Amitabh Bachchan Warn Contestant: 'कौन बनेगा करोडपती'च्या नावाखाली फसवणूक, अमिताभ बच्चन यांनी 'KBC'च्या स्पर्धकांना केलं अलर्ट

KBC Scam: अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना गेम शोमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे देऊ नका असे आवाहन देखील केले.
Amitabh Bachchan On Kaun Banega Crorepati 15 Scam
Amitabh Bachchan On Kaun Banega Crorepati 15 Scam Saam TV
Published On

Amitabh Bachchan on KBC 15:

'बिग बी' अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'च १५ सीजन सुरू आहे. या सीजनमध्ये एका स्पर्धकाने १ करोड रुपये देखील जिंकले आहेत.

'कौन बनेगा करोडपती १५' च्या नवीन भागात प्रेक्षकांना नवीन सेट पाहायला मिळणार आहे. या भागात 'केबीएसी'मध्ये उत्तर प्रदेशची भव्या बंसल हॉट सीटवर दिसणार आहे. भव्यासोबत 'केबीएसी'चा खेळ सुरू केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी होण्यासाठी पैसे मागणाऱ्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.

80 हजार रुपयांसाठी विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर भव्या बंसल देऊ शकली नाही आणि तिने खेळ सोडून दिला. यानंतर, अमिताभ बच्चन यांनी पुन्हा फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंड खेळला. फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये बिहारच्या मंडल कुमारने जिंकला. मंडल कुमारला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली.

हॉट सीटवर बसल्यानंतर मंडल कुमारने एक किस्सा शेअर केला. मंडल कुमारने 'KBC १५'मध्ये येण्याचे कारण सांगितले. तो म्हणाला की, 'मी बिहारमधील चंडी या छोट्याशा गावातला आहे, जिथे लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यांना वाटते की स्पर्धकांना या शोमध्ये येण्यासाठी पैसे द्यावे लागतात. त्याला त्या लोकांना चुकीचे सिद्ध करायचे होते. या शोमध्ये येण्यासाठी स्पर्धकांना पैसे द्यावे लागत नाहीत तर ज्ञान असणे आवश्यक आहे.'

बिग बींनी मंडल कुमारचे आभार मानले आणि लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती केली. अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना गेम शोमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे देऊ नका असे आवाहन देखील केले.

अमिताभ बच्चन म्हणाले, "येस, खूप अफवा पसरल्या आहेत आणि अनेक लोकांना फेक कॉल्स देखील येतात की शोमध्ये सहभागी होण्यासाठी तुमची निवडण्यात करण्यात आली आहे, पण जे प्रेक्षक शो पाहत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, तसं काही नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, तुम्हाला टेस्ट द्यावी लागते आणि तुम्हाच्या ज्ञानच्या जोरावर तुम्ही शोमध्ये सहभागी होऊ शकता.”

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com