Randeep Hooda And Indian Army Soldiers: रणदीप हुड्डाने भारतीय जवानांसोबत धरला बॉलिवूड गाण्यांवर ठेका, Video Viral

Randeep Hooda And Indian Army Soldiers News: काल बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने भारतीय जवानांसोबत काही बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरल्याचे दिसून आले.
Randeep Hooda And Indian Army Soldiers Dance Video Viral
Randeep Hooda And Indian Army Soldiers Dance Video ViralTwitter/ @ANI

Randeep Hooda And Indian Army Soldiers Dance Video Viral

बॉलिवूडच्या आघाडींच्या अभिनेत्यांमध्ये रणदीप हुड्डाचं नाव घेतलं जातं. रणदीपने आजवर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केलं आहे. सध्या रणदीपचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो भारतीय जवानांसोबत काही बॉलिवूड गाण्यांवर त्याने ठेका धरल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्याने सैनिकांसोबत कशाप्रकारे धम्माल मस्ती केली, हे दिसून येत आहे.

Randeep Hooda And Indian Army Soldiers Dance Video Viral
Vivek Oberoi: विवेक ओबेरायची फसवणूक करणाऱ्या चित्रपट निर्मात्याला अटक, नेमकं काय आहे प्रकरण?

सध्या रणदीप ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण पुन्हा एकदा रणदीप एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रणदीपने काल २ ऑक्टोबरचे औचित्य साधत अरुणाचल प्रदेशातील चुना गावात भारतीय लष्करातील सैनिकांसोबत गांधी जयंती साजरी करण्यासाठी सामील झाला.

यावेळी रणदीपसोबत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू सुद्धा उपस्थित होते. या तिघांनीही मागो चुनाच्या अतिउंचीच्या भागामध्ये भारतीय लष्कारासोबत बॉलिवूड गाण्यांवर जबरदस्त ठेका धरला. यावेळी रणदीपने भारतीय लष्करासोबत खास डान्स करत, मोहम्मद रफींच्या ‘सर जो तेरा चक्राये’ हे गाणं गात आपला आनंद द्विगुणीत केला. (Viral Video)

नंतर रणदीप हूड्डाने एएनआय वृत्तसंस्थेसोबत ही संवाद साधला, तो मुलाखतीत म्हणतो, “माझी ईशान्येकडील राज्यांना ही पहिलीच भेट आहे. आपल्या देशाचा एवढा सुंदर भाग पाहून माझा खरोखरंच आनंद द्विगुणीत झाला. तिबेट- चीन सीमेवर रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसोबत डान्स करताना, मला खूप आनंद झाला. या डोंगराळ भागात डान्स करताना माझे ते मनोबल वाढणारे होते...”

Randeep Hooda And Indian Army Soldiers Dance Video Viral
Avadhoot Gupte Video: अखेर अवधूत गुप्तेचं छोटसं स्वप्न पूर्ण, मित्रांसोबत धम्माल करतानाच्या Video सोबत शेअर केला अनुभव

रणदीप हूड्डाच्या कामाबद्दल सांगायचे तर, लवकरच रणदीप ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात रणदीप विनायक दामोदर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नसून गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता.

Randeep Hooda And Indian Army Soldiers Dance Video Viral
Boney Kapoor On Sridevi Died: 'सुंदर दिसण्याच्या नादात श्रीदेवीने गमावला जीव', ५ वर्षांनंतर पती बोनी कपूरनं सांगितलं कारण

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com